Duleep Trophy 2024: मयांक अगरवालच्या 'इंडिया ए'ने बाजी मारली! श्रेयस अय्यरच्या 'इंडिया डी'चा 186 धावांनी पराभव

Duleep Trophy 2024 Live Score: दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यात मयांक अगरवालच्या इंडिया ए ने बाजी मारली आहे.
Duleep Trophy 2024: मयांक अगरवालच्या 'इंडिया ए'ने बाजी मारली! श्रेयस अय्यरच्या 'इंडिया डी'चा 186 धावांनी पराभव
duleep trophytwitter
Published On

दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यात इंडिया ए विरुद्ध इंडिया डी, तर इंडिया बी विरुद्ध इंडिया सी हे चार संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील चौथ्या दिवशी इंडिया ए ने इंडिया डी वर १८६ धावांनी शानदार विजय मिळवला आहे.

तर इंडिया बी विरुद्ध इंडिया सी यांच्यात झालेला सामना ड्रॉ झाला आहे. या सामन्यात इंडिया डी संघाला जिंकण्यासाठी ४८९ धावा करायच्या होत्या. मात्र इंडिया ए संघाला ३०१ धावा करता आल्या आहेत.

तर इंडिया बी आणि इंडिया सी यांच्यात झालेल्या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले नव्हते. हा सामना अनंतपूरमध्ये पार पडला. हा सामना ड्रॉ राहिला आहे. या सामन्यात इशान किशनच्या वादळी खेळीच्या बळावर इंडिया सी ने ५२५ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात इंडिया ही संघाला पहिल्या डावात ३३२ धावा करता आल्या.

Duleep Trophy 2024: मयांक अगरवालच्या 'इंडिया ए'ने बाजी मारली! श्रेयस अय्यरच्या 'इंडिया डी'चा 186 धावांनी पराभव
BCCI चा 'Low-Budget' कारभार! Duleep Trophy तील सामन्यावरुन नेटकरी भडकले, वाचा कारण

इंडिया बी विरुद्ध इंडिया सी सामना ड्रॉ

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात इंडिया बी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंडिया सी संघाकडून इशान किशनने सर्वाधिक १११ धावांची खेळी केली.

तर मानव सुथारने ८२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर इंडिया सी संघाने ५२५ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंडिया बी संघाला ३३२ धावा करता आल्या. इंडिया बी कडून अभिमन्यू ईश्वरनने १५७ धावांची झुंजार खेळी केली.

Duleep Trophy 2024: मयांक अगरवालच्या 'इंडिया ए'ने बाजी मारली! श्रेयस अय्यरच्या 'इंडिया डी'चा 186 धावांनी पराभव
दुसऱ्याच चेंडूवर Ruturaj Gaikwad रिटायर्ड हर्ट! Duleep Trophy मध्ये नेमकं काय घडलं?

दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंडिया सी संघाकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने ६२ धावांची खेळी केली. तर रजत पाटीदारने ४२ धावा केल्या. हा सामना ड्रॉ झाला.

इंडिया ए चा शानदार विजय

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर इंडिया ए ने प्रथम फलंदाजी करताना २९० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंडिया डी संघाला १८३ धावा करता आल्या. दुसऱ्या डावात आघाडी घेऊन मैदानात आलेल्या इंडिया ए संघाने ३ गडी बाद ३८० धावा करत डाव घोषित केला. इंडिया डी संघाला जिंकण्यासाठी ४८८ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंडिया डी संघाला ३०१ धावा करता आल्या. यासह इंडिया ए ने या सामन्यात १८६ धावांनी बाजी मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com