DC vs SRH: हैदराबाद - दिल्ली सामन्यात मोडला गेला षटकार - चौकारांचा महारेकॉर्ड!

DC vs SRH, IPL 2024 Records: सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात अनेक मोठे मोठे रेकॉर्ड मोडले गेले आहेत.
DC vs SRH: हैदराबाद - दिल्ली सामन्यात मोडला गेला षटकार - चौकारांचा महारेकॉर्ड!
DC vs SRH ipl 2024 big record most boundaries scored in this match of ipl amd2000twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात दोन्ही संघातील फलंदाजांकडून धावांचा पाऊस पाडला गेल्याचं पाहायला मिळालं आहे. हैदराबादकडून फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडने तुफान फटकेबाजी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून जॅक फ्रेजर मॅकगर्कने वादळी खेळी केली.

आयपीएल स्पर्धेतील या हंगामात अनेक मोठ मोठे रेकॉर्ड मोडले गेले आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक चौकार आणि षटकार करण्याचा रेकॉर्ड याच मैदानावर बनवला गेला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात एकूण ८१ बाऊंड्री मारले गेले. ज्यात ४३ चौकार आणि ३८ षटकारांचा समावेश होता. आता हैदराबादच्याच सामन्यात आणखी एक मोठा रेकॉर्ड बनवला गेला आहे. या सामन्यात एकूण ७१ बाऊंड्री मारले गेले. ज्यात ४० चौकार आणि ३१ षटकारांचा समावेश होता.

DC vs SRH: हैदराबाद - दिल्ली सामन्यात मोडला गेला षटकार - चौकारांचा महारेकॉर्ड!
IPL 2024 Points Table: हैदराबादच्या पराभवानंतर दिल्लीला मोठा धक्का! मुंबई इंडियन्सची गुणतालिकेत मोठी झेप

या सामन्यादरम्यान हैदराबादने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातील रेकॉर्ड मोडून काढला आहे. हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात एकूण ६९ बाऊंड्री मारले गेले होते. ज्यात ३१ चौकार आणि ३८ षटकार मारले गेले होते. यापूर्वी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात एकूण ६९ बाऊंड्री मारले गेले होते.

DC vs SRH: हैदराबाद - दिल्ली सामन्यात मोडला गेला षटकार - चौकारांचा महारेकॉर्ड!
DC vs SRH, IPL 2024: हैदराबादने पुन्हा एकदा मोडला RCB चा मोठा रेकॉर्ड! IPL इतिहासात असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच संघ

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटक अखेर २६६ धावा केल्या. हैदराबादकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्मा ४९ धावा करत माघारी परतला. या धावांचा पाठलाग करत असताना दिल्ली कॅपिटल्स संघाला सुरुवात तर चांगली मिळाली. मात्र शेवट गोड करता आला नाही. हा सामना दिल्लीने ६७ धावांनी गमावला. दरम्यान दिल्लीकडून फलंदाजी करताना जॅक फ्रेजर मॅकगर्कने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ५ चौकार आणि ७ षटकार मारले. दिल्लीला या डावात १९९ धावा करता आल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com