DC vs LSG : अभिषेक पोरेल आणि शे होप यांची तुफान फटकेबाजी; दिल्लीचं लखनऊसमोर २०९ धावांचं आव्हान

Delhi Capitals Vs Lucknow Super Giants/IPL2024 : अभिषेक पोरेल आणि शे होप याच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने मजबूत धावसंख्या उभारली आहे. होम ग्राऊड अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीने २०८ धावा करत २०९ धावांचा आव्हान नखनऊ समोर ठेवलं आहे.
DC vs LSG
DC vs LSGSaam Digital

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. लखनऊ संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान अभिषेक पोरेल आणि शे होप याच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने मजबूत धावसंख्या उभारली आहे. होम ग्राऊडवर दिल्लीने २०८ धावा करत २०९ धावांचा आव्हान नखनऊ समोर ठेवलं आहे.

प्रथंम फलंदाजीसाठी आलेल्या जॅक फ्रेझर-मॅकगर्क याला पहिल्याच षटकात अर्शद खानने बाद केलं होतं. मात्र अभिषेक पोरेल आणि शे होप यांनी तुफान फटकेबाजी सुरू केली. रवी बिश्नोईने होप ला ३८ धावांवर बाद करत ९२ धावांची ही भागीदारी फोडली. लोकेश राहुलने होप अफलातून कॅच पकडला. तोपर्यंत अभिषेकने २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं होतं. मात्र नवीन उल हकच्या चेंडूवर निकोलस पूरनच्या हाती झेल दिला आणि तंबूत परतला. अभिषेकने ३३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकार ठोकत ५८ धावा केल्या. यांनंतर मात्र संघाची पडझड सुरू झाली आणि रननेटही कमी झाला.

DC vs LSG
GT vs KKR सामना रद्द झाल्यानंतर गुजरात टायटन्सची मोठी घोषणा; फॅन्ससाठी घेतला हा निर्णय

५ षटकात केवळ ३३ धावा करता आल्या आणि दोन गडीही गमावले होते. त्यानंतर आलेल्या रिषभ पंतने मोठे फटके मारालया सुरुवात केली. आता रिषभवर संघाची मदार होती. मात्र १७व्या षटकात नवीनच्या गोलंदाजीवर रिषभने फटका मारला आणि दीपक हुडाच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्याने ३३ धांवाची महत्त्वाची खेळी केली. त्याने स्तब्ससह ४७ धावा जोडल्या. स्तब्सने अवघ्या २२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं आणि दिल्लीला एक मजबूत धावसंख्या उभारून दिली.

DC vs LSG
RCB vs CSK, IPL 2024: बंगळुरुच्या फॅन्ससाठी चिंता वाढवणारी बातमी! RCB vs CSK सामना रद्द होण्याची शक्यता; वाचा कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com