
David Warner viral video: ऑस्ट्रेलिया संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. ४ कसोटी सामन्यांची मालिका झाल्यानंतर आता दोन्ही भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत.
या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघातील आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हयरल होत आहे.
कसोटी मालिकेत डेव्हिड वॉर्नरला हवी तशी कामगीरी करता आली नव्हती. मालिकेतील पहिले २ सामने झाल्यानंतर तो दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. त्यामुळे आगामी वनडे मालिकेत चांगली कामगिरी करून तो जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. (Latest sports updates)
डेव्हिड वॉर्नरचा भारतात प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. तो सोशल मीडियावर हिंदी गाण्यांवर आणि डायलॉगवर रिल्स बनवून शेअर करत असतो.
नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो गल्ली क्रिकेट खेळताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये लहान मुलांसह गल्ली क्रिकेट खेळताना दिसून येत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत त्याने, 'एक छोटीशी गल्ली सापडली, हिट मारायला..'असे लिहिले आहे.
या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची जबाबदारी स्टीव्ह स्मिथच्या हाती सोपवण्यात आली आहे. तर बरेच दिवस संघाबाहेर असलेला ग्लेन मॅक्सवेल देखील या मालिकेत पुनरागमन करताना दिसून येणार आहे.
तसेच दुखापतीमुळे संघाबाहेर झालेला, डेव्हिड वॉर्नर देखील या मालिकेत पुनरागमन करणार आहे. त्यामुळे त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका वेळापत्रक
पहिला सामना- १७ मार्च - शुक्रवार, मुंबई
दुसरा सामना - १९ मार्च- रविवार- विशाखापट्टणम
तिसरा सामना - २२ मार्च, बुधवार, चेन्नई
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.