David Warner: डेव्हिड वॉर्नरवरील लाईफटाईम बॅन हटवला! आता कर्णधार होण्यासही सज्ज

David Warner Lifetime Ban: डेव्हिड वॉर्नरवरील लाईफटाईम बॅन हटवण्यात आला आहे.
David Warner: डेव्हिड वॉर्नरवरील लाईफटाईम बॅन हटवला! आता कर्णधार होण्यासही सज्ज
david warnertwitter
Published On

David Warner Lifetime Captaincy Ban Lifted By Cricket Australia: ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डेव्हिड वॉर्नरवर २०१८ मध्ये झालेल्या बॉल टेम्परिंग प्रकरणामुळे लाईफटाईम बॅन लावला होता. हा बॅन लावल्यानंतर तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या कुठल्याही स्पर्धेत नेतृत्व करु शकत नव्हता.

आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्यावरील हा बॅन हटवण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यापूर्वीच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तो टी-२० लीग स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतो. यासह लाईफटाईम बॅन हटवलण्यामुळे तो आता सिडनी थंडर्स संघाचं नेतृत्वही करु शकतो.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २०१८ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान डेव्हिड वॉर्नरने चेंडूसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. ज्यात कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरॉन बॅनक्राफ्ट यांचाही समावेश होता. वॉर्नर या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असल्यामुळे त्याच्या नेतृत्वावर लाईफाटाईम बॅन लावण्यात आला होता. आता ६ वर्षांनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा निर्णय हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

David Warner: डेव्हिड वॉर्नरवरील लाईफटाईम बॅन हटवला! आता कर्णधार होण्यासही सज्ज
IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे, मात्र तो जगभरातील टी-२० लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसून येऊ शकतो. बिग बॅश लीग स्पर्धेत तो सिडनी थंडर्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो.

वॉर्नरने ३ सदस्यीय समितीसमोर याचिका दाखल केली होती. त्यानंतर वॉर्नरने बंदी उठवण्यासाठीचे सर्व निकष पूर्ण केले. त्यामुळे त्याच्यावरील बॅन हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने जे काही केलं होतं, त्याचा त्याला पश्चाताप असून त्याने त्याच्या आचरणाची जबाबदारी स्विकारली असल्याचं समितीने सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com