CSK vs MI: चेन्नईला नंबर 1 बनण्याची संधी तर मुंबई RCBला मागे टाकणार?

आयपीएल 2021 (IPL 2021) चा दुसरा टप्पा दुबईमध्ये (UAE) चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यातील ब्लॉकबस्टर सामन्याने सुरू होणार आहे.
CSK vs MI: चेन्नईला नंबर 1 बनण्याची संधी तर मुंबई RCBला मागे टाकणार?
CSK vs MI: चेन्नईला नंबर 1 बनण्याची संधी तर मुंबई RCBला मागे टाकणार?Saam Tv
Published On

आयपीएल 2021 (IPL 2021) चा दुसरा टप्पा दुबईमध्ये (UAE) चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यातील ब्लॉकबस्टर सामन्याने सुरू होणार आहे. कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीमुळे 2 मे रोजी आयपीएल 2021 चा पहिला टप्पा स्थगीत करण्यात आला आहे. आता दुसरा टप्पा रविवारी यूएईमध्ये सुरू होणार आहे. भारतात खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात 29 सामने खेळले गेले, तर उर्वरित 31 सामने यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. सीएसके विरुद्ध एमआय सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे.

CSK vs MI: चेन्नईला नंबर 1 बनण्याची संधी तर मुंबई RCBला मागे टाकणार?
IPL 2021 च्या पहिल्या टप्प्यात काय घडलं?; जाणून घ्या एका क्लिकवर

पाच वेळचा चॅम्पियन रोहित शर्माचा (Rohit Sharma) मुंबईचा संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मानला जातो. स्पर्धेतील सर्वात चुरशिचा सामना मुंबई आणि एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई यांच्यात दिसून येते. आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात हे दोन्ही संघ शेवटच्या वेळी आमनेसामने आले होते, मुंबईने हा सामना 4 गडी राखून जिंकला होता. गेल्या 9 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स ने चेन्नई सुपर किंग्जचा 7 वेळा पराभव करण्यात यशस्वी ठरला आहे. त्याचप्रमाणे मुंबई आणि चेन्नई एकूण 31 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये मुंबई 19 वेळा जिंकला आहे, तर चेन्नईचा संघ केवळ 12 वेळा जिंकू शकला आहे. जर आपण सध्याच्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर धोनी अँड कंपनी आघाडीवर आहे.

CSK ने पहिल्या हाफमध्ये खेळलेले 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. अशा प्रकारे ते10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सने 7 सामन्यांत 4 सामने जिंकले आहेत ते चौथ्या क्रमांकावर आहेत. MI vs CSK च्या आजच्या सामन्यात जर चेन्नईने सामना जिंकला तर ते पहिल्या स्थानावर जातील. सध्या, दिल्ली कॅपिटल्स 12 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे तर चेन्नईचे 10 गुण आहेत परंतु CSK चा नेट रन रेट चांगला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com