IND vs BAN 2nd Test: अश्विनची मोठ्या विक्रमाला गवसणी, ३४ वर्षांचा रेकॉर्ड मोडला; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
R Ashwin
R AshwinTwitter
Published On

IND vs BAN 2nd Test: भारत विरुद्ध बांगलादेश दुसऱ्या टेस्टमध्ये आर अश्विन आणि श्रेयस अय्यरच्या दमदार खेळी केली. या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने  (Team India) दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत २-० असा टेस्ट मालिकेवर कब्जा केला. आर अश्विन त्याच्या अष्टपैलू खेळीमुळे प्लेअर ऑफ द मॅच ठरला.

आता रविचंद्रन अश्विनची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये जाते. कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. दुसऱ्या कसोटीत त्याने बॉल आणि बॅटने अप्रतिम खेळ दाखवला आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. यासह अश्विनने 34 वर्षे जुना विक्रमही आपल्या नावावर केला. (Sports News)

R Ashwin
Ind Vs Ban : वाह रे अश्विन-अय्यर...टीम इंडिया टेस्टमध्ये पास; बांगलादेशच्या तोंडून हिरावला विजयाचा घास

बांगलादेशने टीम इंडियाला 145 धावांचे लक्ष्य दिले होते. एकेकाळी, 74 धावांवर 7 विकेट गमावल्याने भारत अडचणीत सापडला होता. परंतु त्यानंतर रविचंद्रन अश्विन नवव्या क्रमांकावर उतरला आणि 42 धावांची नाबाद खेळी केली. नवव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना धावांचा पाठलाग करताना कसोटीत सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू बनला. त्याच्यापूर्वी 1988 मध्ये वेस्ट इंडिजच्या विन्स्टन बेंजामिनने पाकिस्तानविरुद्ध 40 धावा केल्या होत्या. आता अश्विनने हा विक्रम मोडीत काढला आहे.

R Ashwin
Ind Vs Ban : 7, 2, 6, 1...खेळ खल्लास! टीम इंडियाचे दिग्गज कसे ढेपाळले बघा; आता पराभवाचं सावट

बांगलादेशविरुद्ध झंझावाती खेळीनंतर रविचंद्रन अश्विन दिग्गज खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. अश्विन आता कपिल देव, शॉन पोलॉक, स्टुअर्ट ब्रॉड, शेन वॉर्न आणि सर रिचर्ड हॅडली यांच्या पंक्तीत सामील झाला आहे, ज्यांच्याकडे 3000 हून अधिक धावा आणि 400 हून अधिक विकेट्स आहेत. त्याने टीम इंडियासाठी 88 कसोटी सामन्यांमध्ये 449 विकेट आणि 3043 धावा केल्या आहेत.

रविचंद्रन अश्विनने बांगलादेशविरुद्ध श्रेयस अय्यरसोबत आठव्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. भारताने पहिला कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध 188 धावांनी तर दुसरा कसोटी सामना 3 विकेट्स राखून जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com