IPL Auction 2022: लिलावात 'या' खेळाडूंवर सर्वच संघ तुटून पडतील, होईल पैशांचा पाऊस

अंतिम लिलाव यादी 23 डिसेंबरला कोची येथे जाहीर होणार आहे. यात 273 भारतीय आणि 132 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
IPL 2018 Auction News
IPL 2018 Auction News Saam TV
Published On

IPL Auction 2022: IPLच्या नव्या सीजनची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मात्र त्याआधी खेळाडूंची अंतिम लिलाव यादी 23 डिसेंबरला कोची येथे जाहीर होणार आहे. यात 273 भारतीय आणि 132 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

या यादीत 286 अनकॅप्ड खेळाडूंसह 119 कॅप्ड खेळाडू आहेत. मात्र तीन खेळाडू असे आहेत ज्यांच्यावर सर्वच संघाची नजर असेल. सर्वच संघ त्यांच्या तुटून पडू शकतात, त्यामुळे त्यांच्यावर कोट्यवधींची उधळण होऊ शकते. या खेळाडूंवर एक नजर टाकूया. (Sports News)

IPL 2018 Auction News
Arjun Tendulkar: क्रिकेटपेक्षा हे खेळ अर्जुन तेंडुलकरला जास्त आवडायचे, सचिनने स्वत: दिली होती माहिती

बेन स्टोक्स

बेन स्टोक्सची लिलावात बेस प्राईज दोन कोटी रुपये आहे. बेन स्टोक्स हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टॉप अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जातो. बेन स्टोक्स आयपीएल लिलावात सर्वात किमतीला विक्री होणाऱ्या खेळाडूंपैकी एक असेल, असा दावा केला जात आहे. बेन स्टोक्स हा 2018 च्या आयपीएल लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्यावेळी त्याला राजस्थान रॉयल्सने 12.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते. स्टोक्स गेल्या सीजनच्या आयपीएल लिलावात सामील झाला नव्हता, कारण त्याने त्याला काही वैयक्तिक समस्या होत्या. ज्यामुळे राजस्थान रॉयल्सने त्याला गेल्या वर्षी रिलीज केलं होतं. परंतु आता प्रत्येक संघ स्टोक्सच्या रूपाने एक मॅच-विनर शोधण्यास तयार असतील.म्हणूनच त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.

शकिब अल हसन

बांगलादेशच्या शाकिब अल हसनची लिलावात बेस प्राईज 1.5 कोटी रुपये आहे.शाकिबही उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. फलंदाजी, गोलंदाजी या दोन्ही त्याच्या जमेच्या बाजू आहे. मॅच फिरवण्याची ताकद त्याच्याकडे आहे, हे त्याने अनेकदा क्रिकेटमध्ये दाखवून दिलं आहे. यापूर्वी तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे. शाकिबच्या अनुभवाचा फायदा देखील संघाला होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक संघ त्याला खरेदी करण्यासाठी उत्सुक असेल.  (Latest Marathi News)

IPL 2018 Auction News
FIFA World Cup 2022 : फिफा विश्वचषकात मेस्सीची जादू! अर्जेंटिना बनणार विश्वविजेता?

सॅम कुरन

सॅम कुरनची लिलावातील बेस प्राईज दोन कोटी रुपये आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषक जिंकण्यात इंग्लंडच्या सॅम कुरनची महत्त्वाची भूमिका होती. कुरनची अष्टपैलू कामगिरी सर्वांनीच पाहिली. या विश्वचषकात कुरन मॅन ऑफ द सीरिज होता. तर अंतिम सामन्यातही तो मॅन ऑफ द मॅच होता. कुरन याआधी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्सकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला अनुभव, अष्टपैलू कामगिरी आणि समोरच्या संघावर दबाव आणण्याची क्षमता यामुळे प्रत्येक संघ त्याला खरेदी करण्याच प्रयत्न करेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com