
आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले आहेत. चुरशीची लढत पाहण्यासाठी सगळ्यांचेच डोळे मोबाईल किंवा टीव्हीवर एकवटले आहेत. पाकिस्तान संघानं टॉस जिंकला आणि फलंदाजीला सुरूवात केली.या सामन्यात हार्दिक पंड्याने बाबर आझमला बाद केलं. बाबर आझम पुन्हा एकदा पाकिस्तान संघाला चांगली सुरूवात करून देण्यात अपयशी ठरला आहे.
२६ चेंडूंचा सामना करत बाबर आझमने फक्त २३ धावा केल्या आहेत. बाबरला बाद केल्यानंतर, पंड्यानं बाय-बाय असं अॅक्शन केलं. पंड्यानं केलेलं अॅक्शन पाहताच सोशल माध्यमांमध्ये मीम्सचा पाऊस पडला आहे. क्रिकेटप्रेमींनी विनोदी मीम्स तयार करून सोशल माध्यमांमध्ये शेअर केले आहेत.
पंड्याचं रिअॅक्शन व्हायरल
आठव्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलमध्ये, हार्दिक पंड्याने टाकलेल्या चेंडूला जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न बाबर आझमने केला. या प्रयत्नामध्ये बाबर आझम कॅचआऊट झाला. के. एल. राहुलने त्याची कॅच पकडली. त्यानंतर हार्दिक पंड्याने बाबर आझमकडे न पाहता बाय बाय अशी अॅक्शन केली.
हार्दिक पंड्याची अॅक्शन व्हायरल
बाबर आझमची विकेट घेतल्यानंतर हार्दिक पंड्याने व्यक्त केलेला आनंद अद्भुत होता. त्याने दिलेली रिअॅक्शन आगळीवेगळी होती. आठव्या ओव्हरमध्ये पंड्याने बाबरला आऊट केलं. पंड्याने केलेल्या अॅक्शनवरून आता सोशल मीडियात मीम्स पाऊस पडला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.