Asian Games 2023: एशियन गेम्समध्ये बजरंग पूनियाचं पदक हुकलं, बृजभूषण सिंग यांनी साधला निशाणा

Brij Bhushan Singh Statement: आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंग पूनियाच्या पराभवानंतर बृजभूषण सिंग यांनी मोठं वक्तक्य केलं आहे.
Brij bhushan singh said bajrang punia would win asian games gold if had been went trough trails
Brij bhushan singh said bajrang punia would win asian games gold if had been went trough trails Saam tv news
Published On

Brij Bhushan Singh Statement On Bajrang Punia:

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवलं आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकुण १०७ पदकं पटकावली आहे. तर अनुभवी कुस्तीपटू बजरंग पु्नियाला रिकाम्या हाती परतावं लागलं आहे.

बजरंग पु्नियाला जर ट्रायल्स घेऊन पाठवलं असतं तर भारताला नक्की गोल्ड मेडल मिळालं असतं. असं वक्तव्य भारतीय कुस्ती संघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंग यांनी केलं आहे.

भारतीय कुस्तीपटू बजरंग पु्नियाला फ्रीस्टाईल ६५ किलो वजनी गटात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या स्पर्धेतील सेमीफायनलच्या सामन्यात ईरानच्या कुस्टीपटू खलीली रहमानने त्याला १-८ ने पराभूत केलं आहे. त्यानंतर कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात त्याला जपानच्या कुस्टीपटूकडून १०-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Brij bhushan singh said bajrang punia would win asian games gold if had been went trough trails
IND vs AUS, Playing XI: भारत-ऑस्ट्रेलियात आज रंगणार महामुकाबला! कोण मारणार बाजी?, पाहा भारताची प्लेइंग ११

बजरंग पु्नियाबाबत बोलताना बृजभूषण सिंग यांनी म्हटले की, 'याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. मी खात्रीशीर सांगू शकतो की,६५ किलो वजनी गटात भारताला सुवर्णपदक मिळायला हवं होतं. जर ट्रायल्स घेऊन पाठवलं असतं तर, सुवर्णपदक भारतालाच मिळालं असतं. तो बजरंग असो किंवा दुसरा कोणी, सुवर्णपदक मिळालंच असतं.'

तसेच ते पुढे म्हणाले की, 'खेळाडूंची निवड करण्याची प्रक्रिया भावनेच्या भरात वाहून न जाता, ट्रायल्स घेऊनच व्हायला हवी. जो पात्र असेल त्याला संधी मिळायला हवी.' (Latest sports updates)

Brij bhushan singh said bajrang punia would win asian games gold if had been went trough trails
World Cup 2023, Ind VS Aus : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचं सावट? हवामानाचा अंदाज काय सांगतो?

तसेच आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंच्या कामगिरीबाबत बोलताना ते म्हणाले की, 'कुस्तीमध्ये भारताला ५ कांस्यपदकं मिळाली आहेत. एक खेळाडू अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात सुवर्णपदक मिळू शकतं.

रौप्यपदक तर निश्चित आहे. कुस्तीत खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. माझ्या मते ज्यांनी कांस्यपदक पटकावलं आहे, त्यांनी सुवर्णपदक मिळवायला हवं होतं. गेल्या १० महिन्यांपासून भारतात कुस्तीचं वातावरण बिघडलं आहे. ना राष्ट्रीय स्पर्धा, ना कॅम्प. योग्यरित्या सराव झाला असता तर आज कुस्तीचं चित्र काही वेगळं असतं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com