जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे तीन वेळा वर्ल्ड कप जिंकणारे खेळाडू पेलेंच्या निधनाने फुटबॉल जगतावर शोककळा पसरली आहे. वयाच्या 82व्या वर्षी पेले यांनी शेवटचा श्वास घेतला. पेले यांना कोलन कँसर झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.. गुरुवारी 29 डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे केवळ फुटबॉल जगतावरच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींवर शोककळा पसरली आहे.
आपल्या असामान्य कौशल्याने फुटबॉलचा जादूगार म्हणून ओखळले जाणारे पेले यांचे भारतदेशाशी जवळचे नाते आहे. ते दोन वेळा भारत दौऱ्यावर आले होते, ज्यामध्ये त्यांनी फुटबॉलही खेळले होते. ( Football)
महान फुटबॉलपटू पेले यांनी पहिल्यांदा १९७७ मध्ये भारत दौरा केला होता. २७ सप्टेंबर १९७७ ला त्यांनी कोलकात्तामधील ईडन गार्डन मैदानात मोहन बागान यांच्याविरुद्ध सामना खेळला होता. यावेळी ते न्यूयॉर्क कोस्मोस संघासाठी खेळत होते. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या रंगलेला हा सामना खूपच रोमांचकारी ठरला. पेलेंच्या आक्रमक खेळीने डाव रंगला असतानाच बागानच्या खेळाडूंनींही त्यांना जोरदार झूंज दिली. पेलेंनी हा सामना जवळजवळ जिंकलाच होता मात्र वादग्रस्त पेनल्टीने हा सामना शेवटी २-२ ने बरोबरीत झाला.
1977 मध्ये झालेल्या या सामन्यानंतर पेले ऑक्टोबर 2015 मध्ये पुन्हा एकदा भारत दौऱ्यावर आले होते.. यादरम्यान पेले पश्चिम बंगालच्या दुर्गापूजेतही सहभागी झाले होते. यासोबतच इंडियन सुपर लीग ही फुटबॉल स्पर्धाही याच काळात आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान पेलेने काही सामनेही पाहिले होते. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनेही पेले यांची भेट घेतली होती.
यावेळी गांगुलीने "मी तीन विश्वचषक (World Cup) खेळलो आहे. विजेता आणि उपविजेता होण्यात फरक आहे. तीन विश्वचषक जिंकणे आणि गोल्डन बूट जिंकणे ही मोठी गोष्ट आहे अशा शब्दात त्यांचे कौतुक केले होते. यावेळी पेलेंनी भारतात माझे खूप चाहते असल्याने मी भारतात येण्याचे आमंत्रण स्विकारले आहे," असे म्हणत भारताला मी कोणत्याही प्रकारची मदत करु शकलो तर पुन्हा येईन असे आश्वासनही दिले होते. (
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.