तुमच्याकडे कौशल्य असेल तर तुम्ही अडचणींना पार करत यशाच्या शिखरावर पोहोचू शकतात. माणसाकडे विशेष काही करण्याची जिद्द असेल तर तो अपुऱ्या असलेल्या साधनांचा पुरेपूर वापर करत यश साधत असतो. असच काहीसं वैभव सूर्यवंशीने केलंय. वैभवने जे करून दाखवलं आहे ,ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलरकरलाही जमलं नाहीये. वैभवने सर्वात कमी वयात भारताच्या पहिल्या श्रेणीमधील क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय.(Latest News)
वैभव सूर्यवंशीने अवघ्या १२ व्या वर्षी रणजी क्रिकेटमध्ये (Ranji Team) पदार्पण केलंय. वैभवचा जन्म २७ मार्च २०११ रोजी झालाय. शुक्रवारी पटना मोईन-उल-हक स्टेडिअममध्ये झालेल्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात वैभव मैदानात उतरला होता. त्यावेळी त्याचं वय फक्त १२ वर्ष २८४ दिवसाचं होतं. विशेष म्हणजे या वयात सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सुद्धा क्रिकेटमध्ये पदार्पण केलं नव्हतं. सर्वात कमी वयात प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वैभवच्या नावाचा समावेश झालाय. वैभवला त्याच्या वडिलांचं संजीव सूर्यवंशी यांचं मार्गदर्शन लाभलंय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
वैभवाने विनू मांकड ट्रॉफी २०२३ मध्येदेखील आपले कौशल्य दाखवलं होतं. त्याने पाच सामन्यांमध्ये ३९३ धावा केल्या होत्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचं नाव आठव्या क्रमांकावर आहे. यासह वैभव सूर्यवंशीने बिहारसाठी कूच बेहार ट्रॉफी अंडर१९ संघामध्येही २०२३ च्या वर्षी पदार्पण केलं होतं.
वैभवने झारखंडविरुद्ध झालेल्या क्रिकेट सामन्यात १२८ चेंडूत १५१ धावा केल्या होत्या. वैभवची हीच खेळी क्रीडा राज्य निवडकर्त्यांना भावली आणि त्यांचं लक्ष त्याच्याकडे वेधून घेतलं. या सामन्यात वैभवने २२ चौकार आणि ३ षटकार लगावले होते. या सामन्याच्या दुसऱ्या सत्रात त्याने ७६ धावा केल्या. वैभवने भारताच्या अंडर-१९ ब संघात खेळताना चार देशांच्या चतुर्भुज स्पर्धेत ५३, ७४, ०, ४१ आणि ० धावा केल्यात.
या स्पर्धेत इंग्लंडच्या अंडर-१९ आणि बांगला देशच्या अंडर- १९ब संघांचाही समावेश होता. वैभवने या सामन्यांमध्ये १७७ धावा केल्या. बांगलादेश अंडर-१९ ब संघाविरुद्ध खेळताना त्याने अर्धशतक केले होते. दरम्यान जेव्हा रणजी ट्रॉफीमध्ये कमी वयातील खेळाडूचा विषय निघतो तेव्हा या चर्चेत अलीमुद्दीनचं नावही समोर येतं. १९४२-४३ मध्ये १२ वर्ष ७३ दिवसाचं त्यांचं वय असताना त्यांनी रणजी खेळात पदार्पण केलं होतं.
अजमेरमध्ये जन्मलेला अलीमुद्दीनने त्या काळात महाराज प्रतासिंह जिमखाना मैदानात राजपुताना संघाकडून क्रिकेट सामना खेळळा होता. त्यानंतर कमी वयात रणजीत पदार्पण करणाऱ्या खेळाडूंमध्ये एसके बोस हे आहेत. १९५९-६० मध्ये वय १२ वर्ष ७६ दिवसांचं असताना प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्ये त्यांनी पदार्पण केलं होतं. या यादीत तिसऱ्यास्थानी काबिज मोहम्मद रिझवान यांचे नाव येते, वय १२ वर्ष २४७ दिवसांचं असताना त्यांनी रणजीत पदार्पण केलं होतं. त्यांनी सन १९३७ मध्ये रणजी ट्रॉफीचा सामना खेळला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.