T20 World Cup 2024, Warmup Match: हलक्यात घ्यायचं नाय.. सराव सामन्यात नेदरलँडचा श्रीलंकेला २० धावांनी धोबीपछाड
Srilanka vs Netherland T20 WC MatchSaam TV

T20 World Cup, Warmup Match: हलक्यात घ्यायचं नाय.. सराव सामन्यात नेदरलँडचा श्रीलंकेला २० धावांनी धोबीपछाड

ICC T20 World Cup 2024, Srilanka VS Netherlands Warmup Match: आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सुरु असलेल्या सराव सामन्यात नेदरलँडने मोठा उलटफेर केला आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी नेदरलँड संघाने मोठा उलटफेर केल्याचे पाहायला मिळाले आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी सर्व संघांमध्ये सराव सामन्यांचा थरार सुरु आहे. आपल्या पहिल्या सराव सामन्यात नेदरलँडने श्रीलंकेचा पराभव केला आहे. फ्लोरीडातील लॉडरहीच्या सेंट्रल पार्क स्टेडियमच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात नेदरलँडने श्रीलंकेचा २० धावांनी धुव्वा उडवला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या नेदरलँडने २० षटकअखेर ५ गडी बाद १८१ धावा केल्या आहेत. या धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंकेचा संघ १६१ धावांवर आटोपला.

T20 World Cup 2024, Warmup Match: हलक्यात घ्यायचं नाय.. सराव सामन्यात नेदरलँडचा श्रीलंकेला २० धावांनी धोबीपछाड
IPL 2024 Playing XI: IPL 2024 स्पर्धेतील सर्वोत्तम प्लेइंग 11! तुम्हाला काय वाटतं?

नेदरलँडकडून आर्यन दत्त आणि मायकल लेविट हे दोघेही विजयाचे हिरो ठरले आहेत. नेदरलँडकडून फलंदाजी करताना मायकल लेविटने २८ चेंडूच सामना करत ५५ धावांची खेळी केली. या दमदार खेळीच्या बळावल नेदरलँड २० षटकअखेर ५ गडी बाद १८१ धावांपर्यंत मजल मारली. तर कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने १२ चेंडूंचा सामना करत २७ धावांची खेळी केली.

श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी १८२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला साजेशी कामगिरी करता आली नाही. पावरप्लेच्या षटकांमध्ये श्रीलंकेला ४ गडी बाद अवघ्या ३० धावा करता आल्या. श्रीलंकेकडून दासून शनाका आणि धनजंय सिल्वा यांनी मिळून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र नेदरलँडच्या शानदार गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे फलंदाज टिचून फलंदाजी करु शकले नाही. कर्णधार हसरंगाने १५ चेंडूंमध्ये ५ षटकार खेचत ४३ धावा केल्या. मात्र ही खेळी संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी नव्हती. या सामन्यात नेदरलँडने २० धावांनी विजय मिळवला. नेदरलँडचा पुढील सामना ३० मे रोजी होणार आहे.

T20 World Cup 2024, Warmup Match: हलक्यात घ्यायचं नाय.. सराव सामन्यात नेदरलँडचा श्रीलंकेला २० धावांनी धोबीपछाड
Rinku Singh Statement: '१०- १५ रुपयांसाठी तरसायचो, आता ५५ लाख..', IPL च्या मानधनाबाबत रिंकू सिंगचं मोठं वक्तव्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com