Champions Trophy 2025: अखेर झुकावं लागलं! चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये होणार; समोर आली मोठी अपडेट

ICC Champions Trophy 2025 Latest Update: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Champions Trophy 2025: अखेर झुकावं लागलं! चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये होणार;  समोर आली मोठी अपडेट
jay shah,pakistan cricket teamyandex
Published On

ICC Champions Trophy News: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेबाबत आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पाकिस्तानला अखेर बीसीसीआयसमोर झुकावं लागलं आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने होकार दिला आहे.

मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तानातच होणार, मात्र भारतीय संघाचे सामने न्यूट्रल वेन्यूवर खेळवण्यात येतील. भारतीय संघाचे सामने यूएईमध्ये खेळवले जाऊ शकतात. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मुद्द्यावरुन आयसीसी आणि सर्व क्रिकेट बोर्डची एक बैठक पार पडली. या बैठकीत या स्पर्धेच्या आयोजनाबाबत निर्णय घेतला जाणार होता. मात्र बीसीसीआयने या बैठकीत सहभाग घेतला नव्हता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने आता हायब्रिड मॉडेलसाठी होकार दिला आहे. भारतीय संघाचे सामने यूएईमध्ये होणार असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.

Champions Trophy 2025: अखेर झुकावं लागलं! चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये होणार;  समोर आली मोठी अपडेट
IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! संघातील प्रमुख गोलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि यूएईमध्ये चर्चा

या स्पर्धेच्या आयोजनाबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि यूएई यांच्यात चर्चा सुरु आहे. जर सर्वकाही ठरल्याप्रमाणे झालं, तर भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले जाऊ शकतात. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे.

Champions Trophy 2025: अखेर झुकावं लागलं! चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये होणार;  समोर आली मोठी अपडेट
IND U19 vs PAK U19: पाकिस्तानची ओपनिंग जोडी चमकली! भारताविरुद्ध खेळताना पहिल्यांदाच केला हा महारेकॉर्ड

मात्र भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास स्पष्ट नकार कळवला आहे. त्यामुळे पाकिस्तानला हा निर्णय घ्यावा लागला आहे. यापूर्वी पाकिस्तानने हायब्रिड मॉडेलसाठी नकार दिला होता. मात्र अखेर बीसीसीआयसमोर पाकिस्तानला झुकावं लागलं आहे.

आयसीसीची कुठलीही स्पर्धा भारतीय संघाशिवाय होऊच शकत नाही. कारण भारतीय संघ नसेल, तर आयसीसीला आर्थिक नुकसान होऊ शकतं. यासह पीसीबीचंही मोठं नुकसान झालं असतं. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com