David Warner Retirement: वर्ल्डकपमधून बाहेर पडताच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा
david warnersaam tv

David Warner Retirement: वर्ल्डकपमधून बाहेर पडताच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा

ICC T20 World Cup 2024, David Warner News In Marathi: ऑस्ट्रेलियाचा संघ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दरम्यान स्पर्धेतून बाहेर पडताच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील शेवटचा सामना बांगलादेश आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवत सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेतून बाहेर पडताच संघातील अनुभवी खेळाडू डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला असला तरीदेखील तो आयपीएल आणि टी-२० लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसून येईल.

डेव्हिड वॉर्नरबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २०११ मध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून तो तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करतोय. वॉर्नर वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये सुपरहिट ठरला, तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याला आपली छाप सोडता आलेली नाही. आयपीएल स्पर्धेतही त्याची बॅट चांगलीच तळपली. सुरुवातीला त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाच प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाचं प्रतिनिधित्व केलं. यादरम्यान त्याला संघाचं नेतृत्व करण्याची संधीही मिळाली. आयपीएल २०२४ स्पर्धेत तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसून आला होता.

David Warner Retirement: वर्ल्डकपमधून बाहेर पडताच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा
IND vs AUS, Turning Point: इथेच सामना फिरला! वाचा टीम इंडियाच्या शानदार विजयाचे 3 टर्निंग पॉईंट

डेव्हिड वॉर्नरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला ऑस्ट्रेलियाकडून ११२ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ४४.६ च्या सरासरीने ८७८६ धावा केल्या. त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये २६ शतकं आणि ३ दुहेरी शतकं झळकावण्याची नोंद आहे. यादरम्यान त्याने १ तिहेरी शतक देखील झळकावलं आहे.

डेव्हिड वॉर्नरच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आपल्या कारकिर्दीत ४५.०१ च्या सरासरीने ६९३२ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३३ अर्धशतकं आणि २२ शतकं झळकावली. यासह ११० टी-२० सामन्यांमध्ये त्याने १३९.७७ च्या स्ट्राईक रेटने आणि ४०.५२ च्या सरासरीने ६५६५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २८ अर्धशतकं आणि १ शतक झळकावलं आहे.

David Warner Retirement: वर्ल्डकपमधून बाहेर पडताच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर राशिद खानचे डोळे पाणावले! भावुक करणारा VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com