satara riders club
satara riders club

सायकल हिल क्लाइंब स्पर्धा; देशमुख घाटाचा राजा, कुचेकर क़्वीन

सातारा रायडर्स क्लबने आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या पर्यावरण वाचवा व प्रदूषणमुक्त जीवन या उपक्रमाचे विविध क्रीडा संस्थांनी काैतुक केले.
Published on

सातारा : सातारा रायडर्स क्लब यांच्यावतीने आयाेजिलेल्या सायकल हिल क्लाइंब चॅलेंज स्पर्धेत दीप नेटके, विवेक देशमुख, कृष्णा सोनमळे, गायत्री कुचेकर यांनी गटांत पहिला क्रमांक मिळविला. पाेवई नाका ते यवतेश्वर घाट व पुन्हा पाेवई नाका अशी ही स्पर्धा नुकतीच झाली.

या स्पर्धेत सहावर्षापासून ते ६६ वर्षाच्या सायकल रायडर्सनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सातारा (satara), फलटण (phaltan), उंब्रज, मेढा, कोरेगाव, वाई, पाचवड, कराड येथील स्पर्धकांचे चार गट करण्यात आले हाेते. स्पर्धा सुरु झाल्यानंतर शाहू चाैकापासून अदालात वाडा ते समर्थ मंदिर रस्ता हा मार्ग सायकलपटूंनी (bicycle) जाेशात पुर्ण केला. त्यानंतर यवतेश्वर घाट चढताना अनेकांची पाॅवर हाॅऊस येथे दमछाक झाली हाेती. एकमेकांना चिअर अप करीत सायकलपटूंनी स्पर्धा पुर्ण केली.

या स्पर्धेत (bicycle race) १६ वर्षाखालील गटात दीप नेटके, रिहान शेख, पार्थ जाधव, १६- ३५ पुरुष गटात विवेक देशमुख, सूर्या गेंगजे, अश्विन मर्ढेकर, ३५ वर्षावरील पुरुष गटात कृष्णा सोनमळे, दत्ता नवघणे, सचिन नवघणे, तर महिला गटात गायत्री कुचेकर, अद्विता उपाध्याय, केतकी कदम यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले.

घाटाचा किंग हा किताब विवेक देशमुख याने तर घाटाची क्वीन हा किताब गायत्री कुचेकर हिने पटकावला. स्पर्धेतील सर्वात लहान रायडर मजहर शेख व ज्येष्ठ स्पर्धक मधुआण्णा खुळे-देशमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

satara riders club
Champions : रंगतदार सामन्यात भारतीय हाॅकी संघाने पाकला हरवलं

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध उद्याेजक, व्यावसायिकांनी प्रयोजकत्व स्विकारले होते. यशस्वीतांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पदक व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सातारा रायडर्स क्लबने आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या पर्यावरण वाचवा व प्रदूषणमुक्त जीवन या उपक्रमाचे विविध क्रीडा संस्थांनी काैतुक केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com