UP T20 League: भुवनेश्वर कुमार लखनऊकडून खेळणार! इतकी किंमत मोजत दिलं संघात स्थान

Bhuvneshwar Kumar, UP T20 League Auctions: भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारवर यूपी टी-२० लीग स्पर्धेत लाखांची बोली लागली आहे.
UP T20 League: भुवनेश्वर कुमार लखनऊकडून खेळणार! इतकी किंमत मोजत दिलं संघात स्थान
bhuvneshwar kumar yandex
Published On

भारतीय संघातील स्विंगचा किंग म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज भुवनेश्वर कुमार गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाबाहेर आहे. त्याचे भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. कसोटी आणि वनडे क्रिकेटपासून दूर असलेल्या भुवनेश्वर कुमारने आयपीएल स्पर्धेत आपली छाप सोडली आहे.

नुकतेच यूपी टी-२० लीग स्पर्धेचं ऑक्शन झालं. या ऑक्शनमध्ये भुवनेश्वर कुमार हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. भुवनेश्वर कुमारला आपल्या संघात स्थान देण्यासाठी जवळपास सर्वच संघांमध्ये चुरशीची लढत पार पडली. शेवटी लखनऊने त्याच्यावर सर्वात मोठी बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं.

भुवनेश्वर कुमार लखनऊच्या ताफ्यात

या ऑक्शनमध्ये भुवनेश्वर कुमारची बेस प्राईज ७ लाख रुपये इतकी होती. मात्र लखनऊने त्याला आपल्या संघात स्थान देण्यासाठी पूर्ण जोर लावला. शेवटी लखनऊने ३०.२५ लाख किम्मत मोजत त्याला आपल्या ताफ्यात स्थान दिलं. यासह भुवनेश्वर कुमारला एकूण २३.२५ लाखांचा फायदा झाला आहे. त्याला संघात स्थान देण्यासाठी नोएडा किंग्ज, मेरठ मेवरिक्स आणि काशी रुद्रास यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. भुवनेश्वर कुमारसह लखनऊ सुपर जायंट्स संघातील वेगवान गोलंदाज शिवम मावीवर देखील पैशांचा वर्षाव करण्यात आला.

UP T20 League: भुवनेश्वर कुमार लखनऊकडून खेळणार! इतकी किंमत मोजत दिलं संघात स्थान
Paris Olympics 2024: चिराग- सात्विकराज जोडीला मोठा धक्का! दुसऱ्या फेरीतील सामना रद्द; हे आहे कारण

मावी ठरला दुसरा महागडा खेळाडू

भारताच्या वेगवान गोलंदाजांना या स्पर्धेतील ऑक्शनमध्ये चांगलाच भाव मिळाला आहे. भुवनेश्वर कुमार लखनऊकडून खेळताना दिसून येणार आहे. तर काशी रुद्रासने मावीवर २०.५० लाखांची बोली लावली आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत भुवनेश्वर कुमार सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसून आला होता. तर शिवम मावी लखनऊ सुपरजायंट्स संघाचा भाग होता.

UP T20 League: भुवनेश्वर कुमार लखनऊकडून खेळणार! इतकी किंमत मोजत दिलं संघात स्थान
Paris Olympics 2024: अर्जुनची एक चूक अन् पदक हुकलं! रायफल शूटिंगमध्ये भारताला चौथं स्थान

स्पर्धेला केव्हा होणार सुरुवात?

यूपी टी-२० लीग स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाला येत्या २५ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील फायनलचा सामना १४ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. भुवनेश्वर कुमार आणि शिवम मावीसह आणखी एक अनुभवी खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या पियूष चावलाला बेस प्राईजवर संघात स्थान देण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com