Asian Games 2023: एशियन गेम्सपूर्वी BCCI चा मोठा निर्णय! दिग्गज खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी

Team India Head Coach: या स्पर्धेपूर्वी बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
team india
team indiasaam tv

VVS Laxman Appointed As New Head Coach:

भारतात येत्या काही दिवसात वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा सुरू असताना चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू असणार आहेत. या स्पर्धेत भारताचा ब संघ उतरणार आहे.

या संघाच्या नेतृ्त्वाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

team india
Asia Cup 2023: 'केएल राहुलला बाहेर करा.. ', माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्याने खळबळ..

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानूसार NCA प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भुमिका पार पाडताना दिसून येऊ शकतात. तर ऋषिकेश कानिटकर हे भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत .

आशियाई क्रीडा स्पर्धा २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान चीनमध्ये रंगणार आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण सध्या बेंगळुरूतील अलुरमध्ये युवा खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत.

तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी व्हीव्हीएस लक्ष्मणसह गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून माजी भारतीय क्रिकेटपटू साईराज बहुतुले आणि यष्टीरक्षक प्रशिक्षक म्हणून मुनीश बाली यांचा समावेश केला जाऊ शकतो.

महिला संघाबद्दल बोलायचं झालं तर,नवीन नियूक्ती काही महिन्यांसाठी पुढे ढकलली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी राजीव दत्ता हे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जाणार आहेत. तर सुभादीप घोष हे यष्टीरक्षक प्रशिक्षक म्हणून जाणार आहेत. (Latest sports updates)

team india
Asia Cup 2023: आमंत्रण फेटाळलं! आशिया चषकासाठी BCCI अधिकाऱ्यांचा पाकिस्तानात जाण्यास नकार;समोर आलं मोठं कारण

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह (यष्टिरक्षक).

राखीव खेळाडू: यश ठाकुर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, साई सुदर्शन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com