BANW vs INDW टी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार सामने

INDW vs BANW T20 Series: भारत आणि बांगलादेशाच्या महिला क्रिकेट संघात टी 20 मालिका होणार आहे. या मालिकेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिलीय.
INDW vs BANW T20 Series Scheduled
INDW vs BANW T20 Series Scheduled

INDW vs BANW T20 Series Schedule Announced:

क्रिकेट विश्वात यंदा मेन्ससह वूमन्स टी२० वर्ल्ड कप होणार आहे. बांगलादेशमध्ये टी२० वूमन्स वर्ल्ड कप होणार आहे. वर्ल्ड कपच्या तयारीसाठी टीम इंडिया बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारताचा महिला क्रिकेट संघ ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे.(Latest News)

या टी 20 मालिकेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिलीय. ही टी२० मालिका २८ एप्रिल ते ९ मे दरम्यान होईल. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ २३ एप्रिलला बांगलादेशात पोहोचेल आणि १० मेला भारताकडे रवाना होईल. सर्व सामने सिल्हेट येथे खेळवले जातील. दरम्यान आगामी टी२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने वूमन्स टीम इंडियासाठी ही मालिका फायदेशीर ठरेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टी २० मालिकेचं वेळापत्रक

  • पहिला सामना- रविवार २८ एप्रिल

  • दुसरा सामना- मंगळवार ३० एप्रिल

  • तिसरा सामना- गुरुवार२ मे

  • चौथा सामना - सोमवार ६ मे

  • पाचवा सामना - गुरुवार ९ मे

मागील वर्षी झालेली मालिका विविध कारणांनी चर्चेत राहिली होती. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरला वादग्रस्त निर्णयावर बाद दिल्याने नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. दरम्यान हरमनप्रीत कौर आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. तापट स्वभावामुळे हरमनप्रीत नेहमी चर्चेत असते. या आधी देखील ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मागील वर्षी बांगलादेश आणि भारत यांच्यातील अखेरच्या वन डे सामन्यात वाद झाला होता. वन डे सामन्यात हरमनने अम्पायर्सच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत खडेबोल सुनावले होते.

भारतीय कर्णधार हरमनप्रीतला लेव्हल २ च्या गुन्ह्यासाठी हरमनला तिच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला होता. तसेच तिच्यावर दोन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आलेली होती. तिला अम्पायरने बाद देताच हरमनने संताप व्यक्त करत स्टम्पच्या दिशेने बॅट भिरकावली. स्वीप मारण्याच्या प्रयत्नात असलेली हरमन फसली अन् बांगलादेशी खेळाडूंनी विकेटसाठी अपील केली. खरं तर स्लिपमध्ये झेलबाद करण्यासाठी बांगला देशी खेळाडूंनी आपील केली होती. मात्र अम्पायरने तिला पायचीत घोषित करताच हरमनप्रीतचा राग अनावर झाला होता.

INDW vs BANW T20 Series Scheduled
IPL 2024: 4 6 6 4 4 4 ..भीषण अपघातातून बचावला, मैदानात उतरला अन् जिंकला; ऋषभ पंतनं KKR विरुद्ध पाडला धावांचा पाऊस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com