Tim Paine Retirement: भारताविरुद्ध वनडे सीरीज सुरू असताना ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी खेळाडूची निवृत्तीची घोषणा!

Australian captain Retirement: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका सुरू असताना ऑस्ट्रेलियाच्या एका अनुभवी खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे.
Tim Paine Retirement
Tim Paine RetirementSaam tv

Tim Paine Retirement News In Marathi : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून भारतात सुरू झाली आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या एका अनुभवी खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा कसोटी फॉरमॅटचा कर्णधार राहिलेल्या टीम पेनने शुक्रवारी निवृत्ती जाहीर केली आहे. क्वीन्सलँड विरुद्ध टास्मानियाच्या शेफिल्ड शिल्ड प्रथम श्रेणी सामन्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली.

यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या टीम पेनने ऑस्ट्रेलियासाठी एकूण 35 कसोटी सामने खेळले. त्याने 2018 ते 2021 या कालावधीत 23 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्वही केले आहे.

Tim Paine Retirement
Richest Cricketer: अरे तो फक्त गैरसमज..! सर्वांत श्रीमंत खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर नाव आल्यानंतर गिलख्रिस्टचं ट्वीट

दक्षिण आफ्रिकेतील बॉल टॅम्परिंग प्रकरणात स्टीव्ह स्मिथला 2018 साली कर्णधारपद गमवावे लागले होते. या घटनेनंतर टीम पेनला ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार बनवण्यात आले. तो ऑस्ट्रेलियाचा 46 वा कर्णधार ठरला. (Sports News)

टीम पेनने 2021 मध्ये कसोटी कर्णधारपद सोडले होते. त्याच्याशी संबंधित एक वाद चर्चेत आल्यानंतर त्याने कर्णधारपद सोडले होते. टीम पेनने क्रिकेट तस्मानियाच्या एका माजी कर्मचाऱ्याला आक्षेपार्ह संदेश पाठवला होता, त्यावरून प्रचंड गोंधळ झाला होता.

Tim Paine Retirement
Mohammed Shami: मोहम्मद शमीच्या 'ड्रीम बॉलने' केली ग्रीनची दांडी गुल! स्टंप उडून पडला ५ फूट लांब- VIDEO

टीम पेनने 2010 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. टीमने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत कसोटी सामन्यांमध्ये 32.63 च्या सरासरीने धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 92 होती. पेनने यष्टीमागे 157 खेळाडूंचे झेल घेतले आणि स्टंप बाद केले. याशिवाय टीम पेनने ऑस्ट्रेलियाकडून 35 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com