Richest Cricketer: अरे तो फक्त गैरसमज..! सर्वांत श्रीमंत खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर नाव आल्यानंतर गिलख्रिस्टचं ट्वीट

World Richest Cricketer: गिलख्रिस्ट अचानक इतका श्रीमंत खेळाडू कसा बनला याबाबत सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. हा रिपोर्ट क्रिकेट चाहते आणि खेळाडूंसाठी आश्चर्यकारक आहे.
Adam Gilchrist News
Adam Gilchrist NewsSAAM TV

Adam Gilchrist News: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्ट जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू बनल्याचा एक रिपोर्ट समोर आला. यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली. गिलख्रिस्ट अचानक इतका श्रीमंत खेळाडू कसा बनला याबाबत सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. हा रिपोर्ट क्रिकेट चाहते आणि खेळाडूंसाठी आश्चर्यकारक होता. कारण या रिपोर्टमध्ये त्याचे उत्पन्न ३१३२ कोटी रुपये (३८० दशलक्ष डॉलर्स) असल्याचे म्हटले होते.

या रिपोर्टमध्ये जगातील सर्वात श्रीमंत 10 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूचे नाव अग्रस्थानी आहे. त्याचे उत्पन्न 380 दशलक्ष डॉलर्स सांगण्यात आले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सचिन तेंडुलकरचे उत्पन्न 170 दशलक्ष डॉलर असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही खेळाडूंच्या उत्पन्नात एवढी तफावत पाहून अनेकांना धक्का बसला. गिलख्रिस्ट या यादीत अव्वल स्थानावर असल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले.

Adam Gilchrist News
Ind vs Aus: केएल राहुलच्या कॅचने करून दिली धोनीच्या त्या कॅचची आठवण, व्हिडिओ एकदा पाहाच- VIDEO

गिलख्रिस्टने केला खुलासा

विशेष म्हणजे या यादीत महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या आणि विराट कोहली चौथ्या स्थानावर होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू पाचव्या स्थानावर होता. यादीतील इतर सर्व नावे, त्यांचा क्रम आणि उत्पन्न पूर्वीसारखेच होते. परंतु गिलख्रिस्टचे नाव आणि त्याचे उत्पन्न सर्वांनाच चकित करत होते. स्वतः गिलख्रिस्टने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले असून चुकून त्याला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू म्हटले गेले होते असा खुलासा त्याने केला आहे.

अॅडम गिलख्रिस्टने ट्वीट करून म्हटले की, ज्या अॅडम गिलख्रिस्टला या यादीत सर्वात वर दाखवण्यात आले आहे, तो अॅडम गिलख्रिस्ट F45 फिटनेस सेंटर फ्रँचायझीचा मालक आहे. तो पूर्वी क्रिकेटही खेळायचा. याच कारणामुळे या यादीत बिझनेसमन गिलख्रिस्टचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. चुकून ते म्हणजे मी असा काही लोकांचा समज झाला. (Latest Marathi News)

Adam Gilchrist News
IND Vs AUS: वानखेडेवर शमी-सिराजचा 'नुसता राडा'; ऑस्ट्रेलियन फलंदाजांची लोळण; १८८ धावांत खुर्दा

कोण आहे बिझनेसमन गिलख्रिस्ट?

उद्योगपती अॅडम गिलख्रिस्ट यांच्याकडे F45 नावाच्या फिटनेस सेंटरची चैन आहे. 2022 मध्ये त्यांनी 500 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांची कंपनी गेल्या वर्षी न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाली होती आणि त्यामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. (Latest Marathi News)

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटून अॅडम गिलख्रिस्टने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हटले " आमचे नाव सारखे असल्यामुळे लोकांकडून ओळखण्यात चूक झाली, त्यामुळे या चर्चा निर्माण झाल्या."

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com