Asian Games 2023: सिंगापूरविरुद्ध टीम इंडियाने पाडला गोलचा पाऊस, १६-१ ने केला पराभव

India vs Singapore ,Asian Games 2023: भारतीय हॉकी संघाने साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्यात सिंगापूरवर १६-१ ने शानदार विजय मिळवला आहे.
 Asian games 2023 indian hockey team beat singapore by 16-1 sports news in marathi
Asian games 2023 indian hockey team beat singapore by 16-1 sports news in marathiTwitter/ANI
Published On

India vs Singapore Asian Games 2023:

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा जलवा सुरूच आहे. भारतीय हॉकी संघाने साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्यात सिंगापूरवर १६-१ ने शानदार विजय मिळवला आहे. या संपूर्ण सामन्यात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला आहे.

भारतीय संघाने पहिल्याच व्वार्टरमध्ये गोलचं खातं उघडलं, त्यानंतर भारतीय खेळाडूंनी मागे वळून पाहिलं नाही. या सामन्यात भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने ४ गोल केले तर मनदीप सिंगने गोलची हॅट्रीक केली.

 Asian games 2023 indian hockey team beat singapore by 16-1 sports news in marathi
Asian Games 2023: सुवर्णकन्या! टीम इंडियाच्या रणरागिनी लंकेवर पडल्या भारी;थरारक विजयासह पटकावलं गोल्ड मेडल

उज्बेकिस्तानवर मिळवला विजय..

भारतीय हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेचा श्रीगणेशा उज्बेकिस्तानला पराभूत करत केला होता. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने १६-० ने विजय मिळवला होता. आता सिंगापूरला १६-१ ने धुळ चारली आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाकडून मनदीप सिंगने १३ व्या मिनिटाला गोल करत खातं उघडून दिलं. त्यानंतर १६ व्या मिनिटाला ललित कुमारने भारतीय संघासाठी दुसरा गोल केला.

गुजरंत सिंगने २२ व्या मिनिटाला तिसरा गोल केला. पुढच्याच मिनिटाला विवेक सागर प्रसादने संघासाठी चौथा गोल केला. पहिल्या हाल्फमध्ये भारतीय संघाने ६-० ने आघाडी घेतली. (Latest sports updates)

 Asian games 2023 indian hockey team beat singapore by 16-1 sports news in marathi
Gold in Asian Games : भारतीय नेमबाजांचा 'सुवर्ण'वेध, भारताच्या खात्यात पहिलं सुवर्णपदक

दुसऱ्या हाल्फमध्येही भारतीय संघाचा जलवा..

दुसरा हाल्फ सुरू होताच मनदीप सिंगने भारतीय संघासाठी ७ वा गोल केला. त्यानंतर ३८ व्या मिनिटाला ८ वा आणि ४० व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने २ पेनल्टी कॉर्नरमधुन गोल करत संघाला १०-० ची आघाडी मिळवून दिली. ४२ व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने ११ वा गोल केला.

या सामन्यातील ५३ व्या मिनिटाला सिंगापूरकडून जकी जुल्करनेनने ५३ व्या मिनिटाला एकमेव गोल केला. भारतीय संघाने १६-१ ने विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com