Asia Team Championships: पीव्ही सिंधूचं दमदार कमबॅक! भारताचा चीनवर ३- २ ने शानदार विजय

PV Sindhu: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) दुखापतीनंतर शानदार कमबॅक केलं आहे. सध्या ती बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतेय
pv sindhu
pv sindhu yandex
Published On

Asia Team Championships PV Sindhu:

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) दुखापतीनंतर शानदार कमबॅक केलं आहे. सध्या ती बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतेय. या स्पर्धेतील चीनविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने ३-२ ने विजय मिळवला आहे. ग्रुप w मध्ये असलेल्या भारतीय संघाने चीनला हरवत नॉकआऊट फेरीत प्रवेश केला आहे.

फ्रेंच ओपन स्पर्धेदरम्यान झाली होती दुखापतग्रस्त..

गेले काही महिने पीव्ही सिंधू (PV Sindhu) बॅडमिंटन कोर्टपासून दूर होती. गेल्या वर्षी झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेदरम्यान तिच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. आता वर्षभरानंतर कमबॅक केल्यानंतर तिने चीनविरुद्धच्या सामन्यात ४० मिनिटात २१-१७,२१-१४ ने विजय मिळवला. या विजयासह तिने भारतीय संघाला १-० ची आघाडी मिळवून दिली. २ वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू जागतिक क्रमवारीत ११ व्या क्रमांकावर आहे. तर चीनची हेन युई जागतिक क्रमवारीत ८ व्या क्रमांकावर आहे. (Badminton News In Marathi)

pv sindhu
IND vs ENG Test Series: 'रहाणे,पुजाराकडून काहीतरी शिका..' माजी क्रिकेटपटू इशान- अय्यरवर भडकला

पीव्ही सिंधूने पहिला सामना जिंकला. मात्र पुढील सामन्यात तनीषा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा या जोडीला ल्यु शेंग आणि टेन निंगकडून १९-२१ आणि १६-२१ ने पराभवाचा सामना करावा लागला. तर अस्मिता चालिहाला जागतिक क्रमवारीत ९ व्या स्थानी असलेल्या वँग झीकडून १३-२१ आणि १५-२१ ने पराभवाचा सामना करावा लागला आहे.

pv sindhu
IND vs ENG 3rd Test: सरफराजचं पदार्पण होणार! या युवा खेळाडूलाही मिळणार प्लेइंग ११ मध्ये स्थान

गायत्री गोपीचंद आणि त्रीशा जॉली या जोडीने ली यी जिंग आणि लुओ शू मिन या जोडीवर १०-२१,२१-१८ आणि २१-१७ ने विजय मिळवला. शेवटच्या सामन्यात अनमोल खरबने लियो यू वर २२-२०, १४-२१ आणि २१-१८ ने विजय मिळवला. यासह भारतीय संघाने हा सामना जिंकला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com