गेल्या शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपमधील तिसरा सामना झाला. या सामन्यात भारतीय फलंदाजी ढेपाळलेली दिसली. या सामन्यात टीम इंडिया संपूर्ण ५० ही खेळू शकलेली नाही. पावसामुळे पाकिस्तानचा डाव सुरू होऊ शकला नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर पंचांनी दोन्ही कर्णधारांशी बोलून सामना रद्द झाल्याचे घोषित केला.
पाऊस आल्यामुळे टीम इंडियाची इज्जत राखली गेली. पण जगातील टॉप फलंदाज असतानाही टीम इंडिया पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकते, हा प्रश्न अनेकांना पडत असतो. याचं उत्तर भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिलनं दिलंय. आशिया चषकाच्या सुपर ४ चा सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार आहे. हा सामना कोलंबो येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी शुभमन गिलनं भारतीय फलंदाजीविषयी मोठं विधान केलंय. (Latest News on Asia cup)
पाक गोलंदाजांसमोर टीम इंडियाचे फलंदाज अपयशी का होतात, याचं कारण गिलनं सांगितलंय. पाकिस्तान सारख्या दर्जेदार गोलंदाजांचा सामना भारतीय फलंदाज कधीच करत नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध खेळताना फलंदाजांना संघर्ष करावा लागत असल्याच विधान गिलनं केलंय.जेव्हा तुम्ही या स्तरावर खेळत असता, तेव्हा तुमच्या काही कारकीर्दीच्या काही टप्प्यावर तुम्ही डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध खेळलेले असता.
परंतु आमचं तसं होत नाही. इतर संघांच्या तुलनेत आम्ही पाकिस्तानविरुद्ध फार खेळत नाही. त्यांच्याकडे दर्जेदार गोलंदाजी आहे. ती आक्रमक आहे. पण जेव्हा आपण अशा गोलंदाजीचा सामना करत नाही आणि त्याची सवय ठेवत नाही तर त्याचा फरक पडतो, असंही गिल माध्यमांशी बोलताना म्हणाला. याचबरोबर शुभमन गिलनं पाकिस्तान फलंदाज बाबर आझम याच्या खेळाचंही कौतुक केलं. बाबर वर्ल्ड क्लास प्लेअर आहे. त्याला आम्ही फॅलो करत असल्याचं गिल म्हणाला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.