नवी दिल्ली: आधी पाकिस्तान आणि आता श्रीलंका या दोन्ही संघांकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचा (Team India) आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग अवघड झाला आहे. सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाज दोन्हीची खराब खेळी झाली आहे. रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध चांगली सुरुवात केली. पण, नंतरच्या फलंदाजांनी चांगली खेळी केली नाही.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या मधल्या फळीने चांगली सुरुवात करूनही मोठी धावसंख्या उभारता आली नाही, आणि त्यामुळे संघाला मोठा फटका बसला. श्रीलंकेविरुद्धचा सामना हरल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित शर्माने संघाच्या पराभवासाठी फलंदाजांना जबाबदार धरले. 'साधी गोष्ट आहे. संघाचा विजय आम्हाला हवा होता. पण तसं झाले नाही. आम्ही मोठी धावसंख्या उभारू शकलो असतो. आम्ही 10-15 धावा कमी केल्या. सामन्यादरम्यान फलंदाजांना काय करावे लागेल आणि ते कोणत्या प्रकारचे शॉट्स खेळू शकतात हे शिकावे लागेल. गेल्या काही महिन्यांपासून संघ सातत्याने चांगली कामगिरी करत होता. अशा पराभवातून संघ म्हणून खूप काही शिकायला मिळेल, अशी प्रतिक्रिया रोहितने (Rohit Sharma) दिली.
'श्रीलंकेच्या सलामीवीरांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली. ते पाहता आमच्या गोलंदाजांनी चांगला प्रयत्न केला. फिरकी गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी केली. मात्र, अखेरीस श्रीलंकेने दडपण चांगल्या प्रकारे हाताळले. तीन वेगवान गोलंदाजांसह न उतरण्याच्या प्रश्नावर रोहित म्हणाला की, आम्हाला वाटले की मोठ्या चौकारांमुळे आम्ही फिरकी गोलंदाजांचा अधिक चांगला वापर करू शकू. पण, त्याच्या उजव्या हाताच्या फलंदाजांनी सामन्यात बराच वेळ फलंदाजी केली.
'मी दीपक हुडालाही गोलंदाजीत आणण्याचा विचार करत होतो. पण आम्ही जसा विचार केला तसा झाला नाही. आवेश खानने तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. तो खूप आजारी होता, असंही रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.