MI Playing XI: आज अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार? LSG विरुद्ध अशी असेल मुंबईची प्लेइंग ११

MI vs LSG Playing XI, Arjun Tendulkar: आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहे.
MI Playing XI: आज अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार? LSG विरुद्ध अशी असेल मुंबईची प्लेइंग ११
Arjun tendulkar may get chance in playing 11 for mi vs lsg match amd2000twitter

मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सचा संघ लखनऊ सुपर जांयट्स संघाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा मुंबईचा या हंगामातील शेवटचा सामना असणार आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने या हंगामात आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत.

यादरम्यान या संघाला केवळ ४ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे.तर ९ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर लखनऊ सुपर जायंट्स संघाने १३ पैकी ६ सामने जिंकले आहेत. लखनऊला प्लेऑफमध्ये जाण्याची सुवर्णसंधी होती. मात्र गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या संघाचं प्लेऑफमध्ये जाणं जर कठीण झालं आहे.

अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार?

मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो. जसप्रीत बुमराहला या सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. तर अर्जुन तेंडुलकरचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. बुमराहने या हंगामातील १३ सामने खेळले आहेत. त्यामुळे या सामन्यात त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

MI Playing XI: आज अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार? LSG विरुद्ध अशी असेल मुंबईची प्लेइंग ११
IPL 2024 RR vs PBKS: राजस्थानच्या पराभवाचा चौकार! ५ विकेट राखत पंजाब किंग्सचा विजय

या सामन्यात अशी अशू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

मुंबई इंडियन्स: ईशान किशन (यष्टीरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहाल वढेरा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, अर्जुन तेंदुलकर, नुवान तुषारा.

इम्पॅक्ट प्लेयर: रोहित शर्मा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, मोहम्मद नबी, कुमार कार्तिकेय.

MI Playing XI: आज अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार? LSG विरुद्ध अशी असेल मुंबईची प्लेइंग ११
IPL 2024 Playoffs Prediction: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), मार्कस स्टोइनिस, दीपक हुड्डा, निकोलस पूरन, क्रुणाल पंड्या, युद्धवीर सिंग चरक, अरशद खान, रवि बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com