Ajit Agarkar Record: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अजित आगरकर सध्या प्रचंड चर्चेत आहे. चर्चेत येण्याचं कारण म्हणजे, त्याची बीसीसीआयचा चिफ सिलेक्टर म्हणून निवड होणार आहे. चिफ सिलेक्टर बनण्याच्या शर्यतीत अजित आगरकर हे नाव सर्वात पुढे आहे.
अजित आगरकर हा जेव्हा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करायचा, त्यावेळी तो आपल्या भन्नाट गोलंदाजीसाठी ओळखला जायचा. मात्र खूप कमी लोकांना माहित आहे की, अजित आगरकरच्या नावे भारतासाठी वनडेत सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड आहे.
अजित आगरकरने राजकोटच्या मैदानावर झिम्बाब्वे संघाविरुद्व झालेल्या सामन्यात अवघ्या २१ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. अजित आगरकरचा हा रेकॉर्ड आजवर कोणालाही तोडता आला नाही. या डावात त्याने ४ षटकार आणि ७ चौकारांच्या साहाय्याने ६७ धावांची खेळी केली होती. इतकेच नव्हे तर त्याने गोलंदाजी करताना ३ गडी देखील बाद केले होते. यासह संघाला सामना जिंकून दिला होता.
कपिल देवचा मोडला रेकॉर्ड..
भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नावे भारतीय संघासाठी वनडेत सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड होता. त्यांनी १९८३ मध्ये झालेल्या सामन्यात २२ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होती. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या या सामन्यात त्यांनी ७२ धावांची खेळी केली होती. कपिल देवसह वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड आणि युवराज सिंगने देखील २२ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. (Latest sports updates)
वनडेतील सर्वात जलद अर्धशतक..
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम हा दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डीव्हीलियर्सच्या नावे आहे. डीव्हीलियर्सने अवघ्या १६ चेंडूंचा सामना करत अर्धशतक झळकावले होते. तर सनाथ जसयूर्या, कुसल परेरा, मार्टिन गप्टिल आणि लियाम लिविंगस्टोन यांनी १७ चेंडूंचा सामना करत अर्धशतक झळकावले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.