
Afghanistan vs Netherland cricket Match:
विश्वचषक स्पर्धेत आज शुक्रवारी झालेल्या ३४ व्या सामन्यात अफगाणिस्तानने नेदरलँडवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान सलग तिसरा विजय मिळवला आहे. (Latest Marathi News)
नेदरलँडने प्रथम फलंदाजी करताना १८० धावा केल्या. नेदलँडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हशमतुल्लाह शाहिदीने ५१ धावा कुटल्या. तर अजमतुल्लाह ओमरजईने २९ कुटल्या. अफगाणिस्तानने ३१. ३ षटकात ३ गडी गमावून अफगाणिस्तानने नेदरलँडवर मात केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अफगाणिस्तानच्या विजयाने त्यांच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचा आशा कायम आहेत. अफगाणिस्तानने विश्वचषकात चौथा विजय मिळवला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान संघाकडे आठ गुण झाले आहेत. तर विश्वचषकात नेदरलँडला पाचव्या पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. सध्या नेदरलँडच्या खात्यात ४ गुण आहेत.
नेदरलँडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रहमानुल्लाह गुरबाजने १० धावा केल्या. तर इब्राहिम जादरानने २० धावा कुटल्या. अफगाणिस्तान संघाचे ११ व्या षटकापर्यंत २ गडी बाद झाले. त्यानंतर रहमत शाह आणि कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने संघाचा डाव सावरला.
या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७४ धावा केल्या. पुढे रहमद ५२ धावांवर बाद झाला. त्यानंतर शाहिदी आणि अजमतुल्लाह ओमरजईने दमदार खेळ दाखवला. त्यांच्या खेळीमुळे अफगाणिस्तानने नेदरलँडवर ७ गडी राखून विजय मिळवला आहे.
तत्पूर्वी, नेदरलँडने नाणेफेक जिंकून ४६.३ षटकात १७९ धावा केल्या होत्या. अंगेलब्रेक्टने ५८ धावा केल्या. मॅक्सने ४२ धावा केल्या. कॉलिने २९ धावा केल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.