PAK VS AFG 1st T20: ...अन् यांना टीम इंडियाला हरवायचंय! पाकिस्तानला अफगाणिस्तानने लोळवले, ६ गडी राखून विजय

Afghanistan Win Against Pakistan: सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे.
afghanistan win against pakistan
afghanistan win against pakistanTwitter/icc

PAK VS AFG: सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे.

या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी पार पडला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने १३ चेंडू शिल्लक ठेऊन सामन्यात जोरदार विजय मिळवला आहे.

यासह अफगाणिस्तान संघाने इतिहासाला गवसणी घातली आहे.

afghanistan win against pakistan
Issy Wong Hat Trick Video: WPL ची पहिली हॅटट्रिक घेत इस्सीने रचला इतिहास,पाहा तो ऐतिहासिक क्षण - VIDEO

या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी कारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. कारण पाकिस्तान संघाला २० षटक अखेर ९ गडी बाद केवळ ९२ धावा करता आल्या.

पाकिस्तान संघाकडून एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. पाकिस्तान संघाकडून इमाद वसीमने ३२ चेंडूंचा सामना करून केवळ १८ धावा केल्या. तर सइम आयुबने १७ धावांचे योगदान दिले. (Latest sports updates)

हा सामना जिंकण्यासाठी अफगाणिस्तान संघाला ९३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना मोहम्मद नबीने नाबाद ३८ धावांची खेळी केली. तर नजीबुल्लाह जदरानने नाबाद १७ धावांचे योगदान दिले.

या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तान संघाने १७.५ षटकात ४ गडी बाद ९८ धावा करत ६ गडी राखून हा सामना जिंकला.

afghanistan win against pakistan
MI VS DC Head To Head : हरमनप्रीत की लेनिंग? कोणता संघ आहे WPL Final जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार? पाहा रेकॉर्ड्स

आशिया चषक स्पर्धेतील पराभवाचा घेतला बदला..

यापूर्वी आशिया चषक स्पर्धेत जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. तेव्हा याच मैदानावर अफगाणिस्तान संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी बाद करताना १२९ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचे ११८ धावांवर ९ फलंदाज माघारी परतले होते. मात्र शेवटी नसीम शाहने २ षटकार मारून पाकिस्तान संघाला विजय मिळवून दिला होता.

आता अफगाणिस्तान संघाने या पराभवाची व्याजासह परतफेड केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com