Eng vs Afg : बलाढ्य इंग्लंडसमोर तुलनेनं दुबळ्या अफगाणिस्तानचा धावांचा डोंगर, इब्राहिम झद्राननं अक्षरश: कुटून काढलं

Ibrahim Zadran Eng Vs Afg : अफगाणिस्तानचा युवा सलामीवीर इब्राहिम झद्रानने इंग्लंडच्या गोलंदाजांविरुद्ध तुफानी खेळी केली. इब्राहिमने १४६ चेंडूंमध्ये १७७ धावा करत अनेक विक्रम मोडले.
Ibrahim Zadran
Ibrahim ZadranSaam Tv
Published On

Ibrahim Zadran : चॅम्पियन्स ट्रॉफीमधला इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तानचा सामना खेळला जात आहे. या सामन्यामध्ये अफगाणिस्तानच्या संघाने ५० षटकांमध्ये ३२५ धावा केल्या. अफगाणिस्तानच्या संघातल्या अनेक खेळाडूंनी सामन्यात चांगली कामगिरी केली. त्यातही सलामीवीर इब्राहिम झद्रान हा चमकला. त्याने १४६ चेंडूंमध्ये १७७ धावा केल्या.

चॅम्पियन्स ट्रॉफीतला आजचा सामना उपांत्य फेरीच्या हिशोबाने अफगाणिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. या सामन्यामध्ये २३ वर्षीय इब्राहिम झद्रानने १६६ धावा केल्या. त्याने १०६ चेंडूंमध्ये १०० धावा करत वनडे फॉरमॅटमधील पहिले शतक ठोकले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतकीय कामगिरी करणारा इब्राहिम झद्रान पहिलाच अफगाणिस्तानी खेळाडू ठरला आहे. वर्ल्डकपमध्ये शतक ठोकणारा तो अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू आहे.

इब्राहिम झद्रानच्या तुफानी खेळीमध्ये १२ चौकार आणि ६ षटकार यांचा समावेश आहे. या खेळीसह त्याने अनेक विक्रम मोडले आहेत. इब्राहिम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात मोठी खेळी खेळणारा खेळाडू बनला आहे. २०१९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतामध्ये पदार्पण केले होते. त्याच्या या खेळीमुळे अफगाणिस्तानच्या संघाला ३२५ धावा करत आल्या.

Ibrahim Zadran
Yuzvendra Chahal: 'आधी जोरदार भांडण करायची,अन् मग डायमंड..', युझवेंद्र चहलने सर्वकाही सांगितलं

इब्राहिम झद्रान व्यतिरिक्त अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने ६७ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. अजमतुल्ला उमरझाईने ४१ धावा आणि मोहम्मद नबीने ४० धावा केल्या. या चार खेळाडूंच्या योगदानामुळे अफगाणिस्तानला बलाढ्य इंग्लंडसमोर ३२५ धावांचा डोंगर रचता आला. हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ibrahim Zadran
IMLT20: सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या मुलांना इंटरनॅशनल मास्टर्स लीगसाठी क्रिकेट दिग्गजांसोबत मैदानावर उतरण्याची संधी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com