IND vs PAK : भारत-पाक थरार जीवावर बेतला! सामना पाहताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

भारतीय संघाने विजय मिळवताच, देशभरातील क्रिडाप्रेमींनी मोठा जल्लोष केला. मात्र, यादरम्यान एक दुर्देवी घटना घडली.
India vs Pakistan T20 Match
India vs Pakistan T20 Match Saam TV

India vs Pakistan T20 Match : टी २० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी महामुकाबला झाला. वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची जशी अपेक्षा असते, अगदी तसाच हा सामना झाला. अगदी अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यांत भारतीय संघाने (Ind vs Pak)   विजय मिळवला. भारतीय संघाने विजय मिळवताच, देशभरातील क्रिडाप्रेमींनी मोठा जल्लोष केला. मात्र, यादरम्यान एक दुर्देवी घटना घडली.

India vs Pakistan T20 Match
IND vs PAK T20 : बोल्ड झाल्यानंतरही विराटला ३ धावा कशा मिळाल्या? फ्री हिटचा नियम काय सांगतो?

भारत-पाकिस्तान टी २० क्रिकेट सामना पाहताना एका ३४ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बिटू गोगोई असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव असून तो आसामच्या शिवसागर जिल्ह्यातील रहिवाशी होता. प्राप्त माहितीनुसार, बिटू हा रविवारी भारत-पाकिस्तान (Team India) सामना बघण्यासाठी एका थिटरमध्ये गेला होता.

सामना रंगतदार स्थितीत पोहचला असताना, बिटू आणि त्याच्या मित्रांचं टेन्शन वाढलं होतं. कधी जल्लोष तर कधी नाराजी असं त्यांच्यामधील वातावरण होतं. दरम्यान, सामना पाहत असताना अचानक बेशुद्ध होऊन खुर्चीवरून खाली पडला. त्याच्यासोबत असलेल्या इतर मित्रांनी तातडीने बिटूला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

मात्र, रुग्णालयात जाण्याआधीच बिटूचा मृत्यू झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट सामन्यादरम्यान सिनेमागृहात निर्माण झालेल्या प्रचंड आवाजाच्या प्रदूषणामुळे बिटूला हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान, जिल्हा पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. ऐन दिवाळीच्या सणात बिटूचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com