WTC Final: WTC च्या अंतिम सामन्यानंतर 'हे' ५ खेळाडू करू शकतात निवृत्तीची घोषणा!

Players Can Retire After WTC Final: काही भारतीय खेळाडूंसाठी हा सामना शेवटचा सामना ठरू शकतो.
Team India
Team IndiaSaam TV

WTC Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. हा सामना ७ जून रोजी ओव्हलच्या मैदानावर पार पडणार आहे.

ऑस्ट्रलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. तर भारतीय संघाला दुसऱ्या स्थानी मजल मारता आली आहे. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

कारण स्पर्धेच्या पहिल्या हंगामात भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान काही भारतीय खेळाडूंसाठी हा सामना शेवटचा सामना ठरू शकतो.

Team India
Virat Kohli New Tattoo: नवा सिझन, नव्या लूकसह आता पाहा विराट भाऊंचा नवा टॅटू, फोटो सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

आर अश्विन:

आर अश्विन हा भारतीय संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तो मोलाची भूमिका बजावू शकतो.

मात्र तो आता ३७ वर्षांचा झाला आहे. तो आणखी काही महिने भारतीय संघासाठी खेळताना दिसून येईल. त्यामुळे भारतीय संघाला त्याचा पर्यायी गोलंदाज शोधण्याची गरज आहे. (Latest sports updates)

ईशांत शर्मा:

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा हा गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. तसेच मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव सारखे गोलंदाज जोरदार कामगिरी करत आहेत.

त्यांची ही कामगिरी पाहता, ईशांत शर्माला आता प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणं कठीण आहे. तो नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानावर आला होता.

Team India
Virat Kohli Hairstyle: आहा कडक! IPLसाठी कोहलीची झक्कास हेअर स्टाइल,बॉलीवूड स्टार्सला ही सोडलंय मागे -PHOTO

सूर्यकुमार यादव:

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला वनडे आणि कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र तो वनडे आणि कसोटी सामन्यांमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. मात्र अंतिम सामन्यासाठी सूर्यकुमार यादवला संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.

Team India
Shreyas Iyer : IPL तोंडावर असताना श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय! दुखापतग्रस्त असूनही सर्जरी करण्यास दिला नकार

वृद्धिमान साहा :

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरी झाल्यानंतर वृद्धिमान साहा देखील निवृत्तीची घोषणा करू शकतो. रिषभ पंतचा अपघात झाल्यानंतर असे वाटले होते की, त्याची जागा भरून काढण्यासाठी वृद्धिमान साहाला संधी दिली जाईल.

मात्र संघ व्यवस्थापकांनी केएस भरतवर विश्वास दाखवला. आता वृद्धिमान साहाचं कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणं कठीण दिसून येत आहे.

उमेश यादव:

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर निवृत्ती जाहीर करू शकतो. कारण उमेश यादव आता ३५ वर्षांचा आहे. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.

कारण उमरान मलिक सारखा भन्नाट वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज संघात स्थान मिळवण्यासाठी वाट पाहतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com