T-20 World Cup 2024: यंदा विजय टीम इंडियाचाच! ही आहेत ३ प्रमुख कारणं

Team India, T-20 World Cup 2024: भारतीय संघाला जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. त्यामुळे भारतीय संघ 17 वर्षांची प्रतीक्षा संपवून जेतेपदासाठी पूर्ण जोर लावताना दिसून येऊ शकतो.
T-20 World Cup 2024: यंदा विजय टीम इंडियाचाच! ही आहेत ३ प्रमुख कारणं
indian cricket teamgoogle

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा बिगुल वाजला आहे भारतीय संघ टी -20 वर्ल्डकप खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. 1 जून रोजी भारतीय संघ आपला पहिला सराव सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. सराव सामन्यात भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे . या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तर 9 जून रोजी भारताचा संघ पाकिस्तानविरुद्ध 2 हात करताना दिसेल.

या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे यासह 4 राखीव खेळाडूंना संघात स्थान दिले गेलं आहे. या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं आहे. दरम्यान भारतीय संघ 17 वर्षांची प्रतीक्षा संपवून दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनू शकतो.

T-20 World Cup 2024: यंदा विजय टीम इंडियाचाच! ही आहेत ३ प्रमुख कारणं
IPL 2025 Mega Auction: मेगा ऑक्शनमध्ये किती खेळाडूंना रिटेन करता येणार? फ्रेंचाईजींचं टेन्शन वाढलं!

भारतीय संघातील फिरकी गोलंदाज

न्यूयॉर्कमध्ये ज्या खेळपट्टीवर सामना खेळला जाणार आहे, त्या खेळपट्टीवर यापूर्वी एकही आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही. त्यामुळे ही खेळपट्टी कशी असेल याचा अंदाज लावणं जरा कठीण आहे. मात्र भारतीय संघाने या खेळपट्टीवर सराव केला आहे. त्यावेळी फिरकी गोलंदाजांना मदत मिळत असल्याचं दिसून आलं आहे. भारतीय संघात अक्षर पटेल, रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादवसारखे अनुभवी फिरकी गोलंदाज आहेत. हे गोलंदाज कुठल्याही फलंदाजी आक्रमणाला धूळ चारू शकतात.

T-20 World Cup 2024: यंदा विजय टीम इंडियाचाच! ही आहेत ३ प्रमुख कारणं
IPL Loksabha Election Connection: KKR जिंकली आता देशात सत्तांतर होणार? काय आहे सत्तेच्या समीकरणांचं IPL कनेक्शन?

दमदार फलंदाजी

भारतीय संघात एकापेक्षा एक धाकड फलंदाज आहेत. जे कुठल्याही क्षणी येऊन सामना फिरवू शकतात. रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्यावर फलंदाजीची मदार असणार आहे.

आक्रमक खेळ

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत रोहित शर्मा कडून निर्भीड फलंदाजी पाहायला मिळाली होती. पावरप्लेच्या षटकांमध्ये तो गोलंदाजांवर तुटून पडला होता. अनेकदा चांगली सुरुवात करून दिल्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली होती. यावेळी ही रोहित शर्मा असाच काहीसा खेळ करताना दिसून येऊ शकतो.यावेळी भारतीय संघाचा फलंदाजीक्रम देखील मोठा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com