Ishan Kishan News : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना ईशान वादळाने चांगलाच गाजला. भारताचा युवा फलंदाज ईशान किशनने (Ishan Kishan) बांग्लादेशी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत शानदार द्विशतक झळकावले. या स्फोटक खेळीत ईशानने २४ चौकारांसह १० गगनचुंबी षटकारांची आतशबाजी केली.
ईशानच्या या वादळी खेळीमुळे भारताने हा सामना तब्बल २१७ धावांनी जिंकला. या खेळीनंतर देशभरातून ईशान वर कौतुकाचा वर्षाव होत असून बिहारमध्ये जल्लोश केला जात आहे. आयपीएल गाजवणारा हा युवा खेळाडू करोडो संपत्तीचा मालक आहे. जाणून घेवूया ईशानच्या महागड्या कार आणि एकूण संपत्तीबद्दल.
अवघ्या २४ वर्षाचा असलेला ईशान किशन हा प्रतिभावान खेळाडू म्हणून ओळखला जातो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने अनेकदा वादळी खेळी केल्या आहेत. मात्र बांग्लादेशविरुद्ध पहिल्यांदाच त्याची आंतरराष्ट्रीय सामन्यातील वादळी खेळी पाहायला मिळाली. आपल्या दमदार फलंदाजीमुळे ईशान किशन आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू म्हणून ओळखला जातो. महागड्या गाड्यांची आवड असलेल्या ईशानच्या ताफ्यात अनेक आलिशान गाड्यांचा समावेश आहे,
इतक्या संपत्तीचा मालक आहे ईशान किशन
मुळ बिहामधील औरंगाबाद जिल्ह्यातील असलेला असलेला ईशान किशन कमी वयात करोडो संपत्तीचा मालक बनला आहे. ईशानच्या या वादळी खेळीनंतर बिहारमधील पैंतुक या त्याच्या मूळ गावी मोठा जल्लोश केला जात आहे. मीडिया रिपोर्टस नुसार, २०२२ मध्ये ईशानचे नेटवर्थ ४५ कोटी इतकी आहे. ईशान क्रिकेटमध्ये तो यष्टीरक्षक - फलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे. क्रिकेट तसेच ब्रॅंडिगमधून तो भरगच्च कमाई करतो. ईशान किशनची बॅंन्ड व्हॅल्यूही मोठी आहे.
वर्षाला कमावतो ईतके कोटी
ईशान किशनची वार्षिक कमाई सात कोटी इतकी आहे. आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला १५. २५ कोटींमध्ये खरेदी केले होते. तर २०१८ मध्ये मुंबईने ईशानसाठी ६.२० कोटी मोजले होते. आयपीएलमध्ये मुंबईसोबतच तो गुजरात लायन्सकडूनही खेळला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये झारखंड कडून खेळणाऱ्या ईशानने २०१७ मध्ये दिल्लीविरुद्ध खेळताना २७३ रनांची खेळी वादळी खेळी केली होती.
ईशानचे कार कलेक्शन
कमी वयात प्रतिभावान खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान किशनकडे महागड्या गाड्यांचा ताफा आहे. ईशानच्या या ताफ्यात BMW 5 Siries चा समावेश आहे ज्याची किंमत ७२ लाख रुपये आहे. यासोबतच ईशानकडे ९२ लाखाची फोर्ड मुस्टांग आणि १. ०५ कोटीची मर्सिडिज बेंज C- Class सुद्धा आहे. सोबतच ईशानने रियल इस्टेटमध्येही मोठी गुंतवणुक केली आहे.ईशानचे वडिल प्रणव कुमार पांडेय व्यवसायाने बिल्डर आहेत. तर आहे गृहिणी आहे. बांग्लादेश विरुद्धच्या वादळी खेळीनंतर ईशानची ब्रॅंड व्हॅल्यू आणखी वाढण्याची शक्यता आहे. आपल्या दहाव्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात ईशानने द्विशतक ठोकत धमाल केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.