WPL 2023: क्रिकेटसाठी शिक्षणाचा केला त्याग,धारावीची २१ वर्षीय सिमरन शेख WPL खेळण्यास सज्ज

या स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. अशीच एक युवा खेळाडू म्हणजे २१ वर्षीय फलंदाज सिमरन शेख.
simran shaikh
simran shaikhsaam tv
Published On

Simran shaikh WPL 2023: आजपासून महिलांची सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा म्हणजेच विमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायन्ट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.

या स्पर्धेत जगभरातील महिला क्रिकेटपटू एकमेकांविरुध्द खेळताना दिसून येणार आहे. याचा फायदा तरुण खेळाडूंना होणार आहे. या स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. अशीच एक युवा खेळाडू म्हणजे २१ वर्षीय फलंदाज सिमरन शेख. (Latest sports updates)

simran shaikh
IND VS AUS test series: 'लालसेमुळं टीम इंडियाने गमावली इंदूर कसोटी..' दिग्गजाने सांगितलं टीम इंडियाच्या पराभवाचं खरं कारण

जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणाऱ्या धारावीच्या झोपडपट्टीतून युपी वॉरियर्स संघाने एक हिरा शोधून काढला आहे. २१ वर्षीय सिमरन शेख आता थेट आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिला युपी वॉरियर्स संघाने १० लाखांच्या मुळ किमतीत आपल्या संघात स्थान दिले आहे.

मुलांसोबत खेळायची क्रिकेट..

प्रत्येक क्रिकेटपटूची सुरुवात ही गल्ली क्रिकेटपासून होत असते. सिमरन शेखने देखील गल्ली क्रिकेटपासूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ती सुरुवातीला मुलांसोबत क्रिकेट खेळायची. १५ व्या वर्षापासून ती गोलंदाजांची चांगलीच धुलाई करायची.

क्रिकेट हे मोठ्या प्रमाणावर खेळले जाते हे तिला माहीतच नव्हते. मात्र तिला जेव्हा ही बाब कळाली तेव्हा तिने क्रॉस मैदानावरील युनायटेड क्लबच्या रोमडे सरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे प्रशिक्षक घ्यायला सुरुवात केली.

simran shaikh
Ind Vs Aus Indore Test : इंदूर कसोटीनंतर ICC ची मोठी कारवाई; खेळपट्टी अन् मैदान...

कुटुंबाने दिला पाठिंबा..

बहूतांश मुस्लिम कुटुंबात मुलींवर बंधने लादली जात असल्याची आपण अनेक उदाहरणं पाहिली आहेत. मात्र सिमरनच्या बाबतीत असं काहीच पाहायला मिळालं नाही. सिमरनाळा ४ बहिणी आणि ३ भाऊ आहेत. तिची आई घर सांभाळते. तर वडील वायरिंगचे काम करतात. परिस्थिती हलाखीची असतानाही तिच्या वडिलांनी तिला क्रिकेट खेळण्यापासून रोखलं नाही.

simran shaikh
IND VS AUS 3rd Test: 'आपण जडेजामुळे हरलो..' सुनील गावसकरांनी जडेजावर फोडलं पराभवाचं खापर

शिक्षण सोडून क्रिकेट खेळण्याचा घेतला निर्णय..

सिमरनला शिक्षण की क्रिकेट या २ पर्यायांपैकी एक निर्णय घ्यायचा होता त्यावेळी तिने क्रिकेटची निवड केली. दहावीत असताना ती नापास झाली, त्यानंतर तिने पुढे शिक्षण न करता क्रिकेट खेळत राहण्याचा निश्चय केला. तिचा हा निर्णय कुठेतरी योग्य ठरतोय.

क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी करत तिने मुंबईच्या १९ वर्षाखालील संघात स्थान मिळवले. या स्तरावर जोरदार कामगिरी केल्यामुळे तिला मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून खेळण्याची देखील संधी मिळाली होती.

भारतीय संघाला वर्ल्ड काप जिंकवून देण्याचं स्वप्न..

विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धा ही तिच्यासाठी खूप खास ठरणार आहे. कारण या स्पर्धेच्या निमित्ताने तिला झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, मिताली राज आणि स्म्रीती मंधानासह अनेक दिग्जज खेळाडूंसह चर्चा करण्याची तिला संधी मिळणार आहे. तसेच तिचे स्वप्न आहे की, तिने एक दिवस भारतीय संघाची जर्सी घालून मैदानात उतरावं आणि भारतीय संघाला विश्वचषक जिंकवून द्यावं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com