Rashi : ५०० वर्षांनंतर सूर्य ग्रहणात ४ ग्रहांचा संयोग; 'या' राशींच्या लोकांना येणार अच्छे दिन

Solar Eclipse 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ८ एप्रिल रोजी सूर्य ग्रहण होणार आहे. यावेळी चार ग्रहाचा संयोग होणार असल्याने काही राशींना चांगले दिवस येणार आहेत.
Solar Eclipse 2024
Solar Eclipse 2024

Rashi Surya Grahan:

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ८ एप्रिल रोजी सूर्य ग्रहण होणार आहे. हे संपूर्ण सूर्यग्रहण असेल. या दिवशी मीन राशीतील ग्रहांचा राजा सूर्य, बुद्धिमत्ता आणि व्यापार देणारा बुध, मायावी ग्रह राहू आणि धनाचा दाता शुक्र मीन राशीत राहणार आहेत. यामुळे मीन राशीमध्ये चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. म्हणजेच सूर्यग्रहणाच्या दिवशी चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. हा योगायोग तब्बल ५०० वर्षांनंतर घडत आहे. (Latest News)

परंतु या योगायोगमुळे काही राशींना चांगले दिवस येणार आहेत. तसेच या राशींच्या संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या राशी या भाग्यशाली ठरणार आहेत.

मेष राशी

सूर्य ग्रहणाच्या काळात चार ग्रहांचे एकत्र येणे या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. बहुतेक लोकांना अनपेक्षितपणे धन लाभ मिळतील. आगामी काळात शैक्षणिक स्पर्धेच्या दिशेने यश देखील मिळेल.

जे लोक व्यापार करता किंवा व्यावसाय करतात त्यांना या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळतील. नोकरदारांना पदोन्नती आणि वेतनवाढीची शक्यता आहे. तर अनेकांना पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. अनेकांची आर्थिक स्थिती सुधारणार असून अनेकांना वडिलांकडूनही सहकार्य मिळेल.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सिंह राशी

सूर्य ग्रहण आल्यानंतर ४ ग्रहांचा संयोग झाल्याने सिंह राशीच्या जातकांना फायदा होणार आहे. यावेळी तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढेल. तसेच अनेकांच्या मनोकामना पूर्ण होतील. बहुतेकांना त्यांच्या जोडीदारांनाकडून आणि कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल. तर काहींना त्यांच्या कामात सन्मान मिळेल.

ज्या लोकांकडे तुमचे पैसे अडकलेत त्यांच्याकडून पैसा मिळेल. या काळात मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा योग आहे. तर काही जातकांना त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळू शकतो.

धनु राशी

सूर्यग्रहणाच्या दिवशी चार ग्रहांचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. अनेक जातकांची आर्थिक स्थिती सुधारेल. बहुतेक लोकांचे व्यक्तिमत्वही सुधारेल. नवीन आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळण्याची शक्यता या काळात आहे. जे जातक व्यावसाय करतात त्यांच्यासाठी हा काळ खूप फायदेशीर आहे. त्यांना त्यांच्या कल्पनांचा फायदा होऊ शकतो. या राशीमधील काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे.

टीप: येथे देण्यात आलेली माहिती ही ज्योतिष आणि वैदिक शास्त्रावरून घेण्यात आलीय. साम टीव्ही या गोष्टींशी सहमत नाहीये.

Solar Eclipse 2024
Rashi : एप्रिल सुरू होताच बुध आणि शुक्र तयार करतील ‘लक्ष्मी नारायण योग’; 'या' ३ राशी होतील मालामाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com