Saphala Ekadashi 2024: सफला एकादशीला 'या' राशींचा येणार शुभयोग; होईल धनलाभ

Saphala Ekadashi : हिंदू कॅलेंडरनुसार, सफला एकादशीचा व्रत दरवर्षी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार यावेळची सफाला एकादशी अनेक राशींसाठी खास असणार आहे.
Saphala Ekadashi 2024
Saphala Ekadashi Saam Tv
Published On

हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. ही एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित आहे. एकादशीचे व्रत केल्यास सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. या एकादशीचं व्रत पाळल्यानंतर जीवनात आनंद येतो. काही दिवसात 2024 वर्ष संपणार आहे, पण त्यापूर्वी सफाला एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे.

सफला एकादशीला पौष कृष्ण एकादशी असेही म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार, सफला एकादशीचा व्रत दरवर्षी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला केला जातो. यावेळी हे व्रत 26 डिसेंबर 2024 रोजी पाळण्यात येणार आहे. ही वर्षातील शेवटची एकादशी असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार यावेळची सफाला एकादशी काही राशींसाठी खूप खास असणार आहे. या राशीच्या लोकांना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ.

Saphala Ekadashi 2024
Gemini Horoscope: नववर्षात मिथुन राशींच्या लोकांना शनीच्या कृपेने व्यवसायात होणार नफा, वाचा वार्षिक राशीभविष्य

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी सफला एकादशी शुभ असणार आहे. भगवान विष्णूच्या कृपेने काहींना त्यांच्या व्यवसायात नवीन संधी मिळेल. तब्येत सुधारेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात यश मिळेल. गुंतवणुकीतून नफा मिळेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगली कमाई होऊ शकते. तुम्ही परदेश दौऱ्यावर जाण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला संधी मिळू शकते.

Saphala Ekadashi 2024
Cancer Horoscope: कर्क राशीच्या लोकांचे नशीब उजळणार; वर्षाची सुरुवात होणार चांगली, वाचा वार्षिक राशीभविष्य

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठीही सफला एकादशी शुभ ठरेल. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होईल. जोडीदाराशी संबंध सुधारतील. एखाद्या कामात यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. ऑनलाइन काम करणाऱ्यांचा पगार वाढू शकतो. मुलांकडून सन्मान मिळेल. तसेच लव्ह लाईफ सुधारेल. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये अचानक यश मिळेल.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांना या एकादशीला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळेल. घरात शांतता आणि स्थिरता लाभेल. जे लोक व्यवसाय करत असतील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, त्यांच्या व्यवसायात नफा मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. या राशीतील लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीत असाल तर पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.

मीन राशी

मीन राशीच्या लोकांच्या घरात आनंदाचे वातावरण राहील. काहीजण त्यांच्या प्रिय जोडीदारासोबत नवीन काम सुरू करू शकता. ऑफिसमधील सहकारी तुम्हाला साथ देतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातील समस्या संपतील. व्यवसायात वाढ होईल. काही लोकांचं कौटुंबिक जीवन आनंदमय होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com