मुंबई : आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटले जाते. आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असे मानले जाते.
हे देखील पहा -
श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला दीप अमावस्या म्हणताता. यंदा ही अमावस्या २८ जुलै गुरुवारी आली आहे. या दिवशी निसर्ग हसतमुख दिसतो. तसेच या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी रोपे लावल्याने देवाची कृपा होते असे म्हणतात. तसेच एखाद्याच्या कुंडलीत ग्रहदोष असेल तर त्यामध्येही शांतता निर्माण होते. यासोबतच भगवान शंकराची कृपाही प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊया राशीनुसार कोणती रोप लावल्यास ग्रह दोषात शांती मिळेल हे जाणून घेऊया.
१. मेष राशीच्या लोकांनी या दिवशी आवळ्याचे झाड लावावे. याने आपल्याला अनेक लाभ होतील.
२. वृषभ राशीच्या लोकांनी ग्रह दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी जांभळाचे झाड लावयला हवे.
३. शंकाराची विशेष कृपा मिळविण्यासाठी मिथुन राशीच्या लोकांनी दीप अमावस्येला किकरचे झाड लावावे.
४. ग्रह दोष किंवा इतर कोणत्याही समस्यांशी लढत असाल तर या दिवशी पिंपळाचे झाड लावणे कर्क राशीसाठी शुभ राहील.
५. सिंह राशीच्या लोकांसाठी या दिवशी वटवृक्ष लावायला हवा. तसेच हवे असल्यास अशोकाचे झाडही लावू शकतो. ही झाडे लावल्यास आपल्याला समस्या बऱ्याच अंशी कमी होतील.
६. या दिवशी कन्या राशीच्या जातकाने जुही किंवा बेलाचे झाड लावल्यास भगवान शंकराच्या कृपेने आपले ग्रह दोष दूर होतील.
७. या दिवशी अर्जुन आणि नागकेसर रोप लावणे तूळ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
८. वृश्चिक राशीचे लोक मांगलिक असतील किंवा मंगल दोषाने त्रस्त असतील तर या दिवशी कडुलिंबाचे रोप (Plant) लावावे.
९. दीप अमावस्येच्या दिवशी धनु राशीच्या लोकांनी अर्कचे झाड लावले तर त्यांना खूप फायदा होतो. अर्कचे झाड लावल्याने त्यांना भगवान शंकराचा विशेष आशीर्वादही प्राप्त होईल.
१०. या अमावस्येच्या दिवशी नारळाचे झाड लावणे मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर (Benefits) ठरणार आहे.
११. कुंभ राशीच्या लोकांना ग्रह दोष टाळायचे असतील तर आंब्याचे किंवा कळंबाचे रोप लावा.
१२. मीन राशीच्या लोकांसाठी ग्रहांचे दोष टाळण्यासाठी मनुक्याचे झाड लावयला हवे. मनुका वनस्पती आपल्याला ग्रह दोषांसह भगवान शिवाच्या कृपेचा भागी बनवेल.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
Edited By - Komal Damudre
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.