Camphor Benefits: पूजेच्या वेळी आपण कापूर का जाळतात? जाणून घ्या कापूर जाळण्याचे फायदे

Burning Camphor: हिंदू धर्मात केल्या जाणाऱ्या पूजाविधींमध्ये प्राचीन काळापासून कापूर जाळला जातो. हिंदू मान्यतेनुसार कापूर जाळल्याने अनेक आध्यात्मिक फायदे होतात. घरामध्ये कापूर जाळल्याने सकारात्मकता आणि शांती मिळते. कापूरमुळे देवी-देवता प्रसन्न होतात.
Burning Camphor
Burning Camphorsaam
Published On

Benefits of Burning Camphor:

घरातील पूजेदरम्यान कापूर वापरल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहत असतं, असं हिंदूग्रंथांमध्ये म्हटलंय. पूजेच्या वेळी कापूर जाळल्याने घरात नेहमी आनंदाचं वातावरण असतं आणि घरातील नकारात्मकता जात असते. कपूरमध्ये असलेल्या सुगंधामुळे घरातील वातावरण सकारात्मक बनत असते. तसेच आरोग्याच्या अनेक समस्यांमधून आपली सुटका देखील होत असते. हिंदू मान्यतेनुसार पूजा किंवा हवनात कापूर वापरला नाही तर पूजा अपूर्ण मानली जाते. चला तर जाणून घेऊया की पूजेदरम्यान कापूर जाळणे शुभ आहे का? कापूर जाळण्याचे काय फायदे आहेत?(Latest News )

हिंदू धर्मात केल्या जाणाऱ्या पूजाविधींमध्ये प्राचीन काळापासून कापूर जाळला जातो. हिंदू मान्यतेनुसार कापूर जाळल्याने अनेक आध्यात्मिक फायदे होतात. घरामध्ये कापूर जाळल्याने सकारात्मकता आणि शांती मिळते. कापूरमुळे देवी-देवता प्रसन्न होतात.

कापूर जाळण्याचे फायदे

घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण शुद्ध होते. कापूर जाळण्याचा सुगंध हानिकारक विषाणू आणि जीवाणू नष्ट होत असतात. संध्याकाळी मातीच्या भांड्यात कापूर जाळून त्याचा धूर घरभर पसरत असतो, असे केल्याने घरातील सर्व दोष दूर होतात. ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये कापूर जाळल्याने पितृदोषही दूर होत असतात. याशिवाय घरातील वाईट नजरेचा प्रभाव कमी होतो आणि नात्यात गोडवा राहत असतो.

कापूर जाळण्याचे वैज्ञानिक कारण

शास्त्रानुसार घरामध्ये कापूर जाळल्याने हानिकारक बॅक्टेरिया आणि प्रदूषण कमी होत असते. कापूरच्या धुरामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या टाळता येतात. घरात कापू जाळल्याने घरातील हवा शुद्ध राहते असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com