Rashi Grah: तुमच्या कोणत्या सवयींमुळे कोणते ग्रह होतात कमजोर, जाणून घ्या

Habits affect planets: आपल्या अनेक चुकीच्या सवयींमुळे ग्रहांवरही परिणाम होतो, ज्यामुळे आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो. चुकीच्या सवयींमुळे ग्रहांवर काय परिणाम होतो ते पाहू.
Habits affect planets
Habits affect planetsMP Breaking
Published On

Habits Affects On Grah :

माणसाच्या जीवनात ग्रहांचे खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या ग्रहाच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक मोठे बदल घडतात. याशिवाय व्यक्तीच्या सवयींचा ग्रहावर मोठा प्रभाव पडत असतो. एखाद्या व्यक्तीच्या काही सवयींमुळे त्यांना अडचणीचा सामना करवा लागतो. एखाद्या व्यक्तीच्या अशा काही सवयींविषयी सांगणार आहोत, ज्यामुळे त्याचे ग्रहदेखील रागावतात. ग्रह नाराज झाल्यामुळे त्यामुळे व्यक्तीला जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या वाईट सवयी आहेत, ज्यांचा परिणाम ग्रहांवर होतो.(Latest News)

वाकून का बसू नये

जे लोक बहुतेक वेळा वाकून बसतात त्यांना त्यांच्या कामाचे फळ मिळत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार वाकून बसल्याने सूर्य कमजोर होतो. ज्या लोकांचा सूर्य कमकुवत असतो त्यांना मेहनत करूनही अपेक्षित ओळख मिळत नाही. म्हणूनच तुम्ही नेहमी तुमच्या खांद्यावर सरळ बसावे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नखे का चावू नयेत?

बोटांची नखे चावू नयेत. नियमानुसार नखे चावल्याने शनी कमकुवत होतो. कमजोर शनिमुळे जीवनातील प्रत्येक कामात विलंब होतो. यामुळे संबधित व्यक्तील यश मिळविण्यात अडचणींचा सामना करावा लागतो.

पाय का हलवू नयेत?

बसल्यानंतर पाय हलवल्याने शनीवर परिणाम होतो. शनीच्या कमकुवतपणामुळे जीवनात अस्थिरता आणि दुर्भाग्य येते असं मानले जाते. याशिवाय त्या व्यक्तीच्या कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी राहत नाही.

वारंवार डोके का खाजवू नये?

काही लोकांना वारंवार डोकं खाजवण्याची सवय असते, पण ज्योतिषशास्त्रानुसार असं करणं योग्य नाही. जे लोक वारंवार डोके खाजवतात त्यांना मंगळ ग्रहाचा प्रभाव पडतो. एखाद्या व्यक्तीच्या मंगळ ग्रहाचा प्रभाव असेल तर त्याच्या वागण्यात बदल होऊ लागतात. छोट्या छोट्या गोष्टींवर त्याला राग येऊ लागतो

ओठ चावू नये?

काही लोक बसल्यावर ओठांच्या आतील भागाला चावायला लागतात. पण असे करणे त्यांना महागात पडू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार ओठ चावल्याने बुध ग्रह कमजोर होतो. ज्या लोकांचा बुध कमजोर असतो त्यांना आयुष्यात कधीही मानसिक शांती मिळत नाही. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल चिंतेत असतात.

Habits affect planets
Rashi Guru: २०२४च्या शेवटपर्यंत 'या' ३ राशींवर राहील गुरुची कृपा; आर्थिक चणचण होणार दूर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com