
राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये भरती
प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी भरती
६२०० पदांसाठी होणार भरती
राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील उच्च महाविद्यालयांमध्ये साडेपाच हजार पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तर विद्यापीठांमध्ये ७०० प्राध्यापकांसाठी भरतीसाठी मान्यता देण्यात आली आहे. याचसोबत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीही भरती होणार आहे. (Teacher and Professor Recruitment)
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. अकृषिक विद्यापीठांमध्ये २९०० प्राध्यांपकापैकी २२०० प्राध्यापकांची भरती याआधीच झाली आहे. उर्वरीत ७०० प्राध्यापकांची भरती पुढच्या महिन्याभरात केली जाईल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पुणे आणि इतर अनेक विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. १५ दिवसांत मुलाखती घेऊन त्यांची भरतीदेखील पूर्ण होईल, असंही त्यांनी सांगितले. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व १०९ उच्च महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत.प्राध्यापकांची भरती कशी करायची, यातील मतप्रवाहामुळे २ वर्षे भरती प्रक्रिया लांबली. त्यानंतर आता वित्त विभागाची परवानगी मिळाली आहे. त्यानंतर विद्यापीठासह महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. महिन्याभरात ही भरती केली जाणार आहे.
विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील या भरतीबाबत लवकरच अपडेट समोर येईल. विद्यापीठ आणि उच्च महाविद्यालये याबाबत अधिसूचना जाहीर करतील. त्यानंतरच भरती प्रक्रिया पूर्णपणे सुरु केली जाईल. ही भरती कशी होणार याबाबतही माहिती देण्यात येईल. प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी भरती जाहीर करण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.