SBI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; पगार १,०५,२८० रुपये; अर्ज कसा करावा?

SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठीभरती भरती जाहीर करण्यात आली आहे.
SBI Recruitment
SBI RecruitmentSaam Tv
Published On
Summary

स्टेट बँकेत सरकारी नोकरीची संधी

स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आता वाढवून देण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

SBI Recruitment
Job Recruitment : एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियात ९०० हून अधिक पदासाठी भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. तुम्हाला जर काही कारणांनी अर्ज करता आले नसतील तर ही चांगली संधी आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

पात्रता (Eligibility)

स्टेट बँकेतील या नोकरीसाठी २५ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ग्रॅज्युएशन किंवा मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत त्यांना बॅलेन्स शीट, अप्रेजल, क्रेडिट प्रपोजल, क्रेडिट मॉनिटरिंग याबाबत माहिती असायला हवी. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ८५,९२० ते १,०५,२८० रुपये पगार मिळणार आहे.

SBI Recruitment
DRDO Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार डीआरडीओमध्ये नोकरी; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी (Government Job Without Exam)

या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी sbi.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

SBI Recruitment
Pune IT Jobs : टाटांच्या कंपनीत नोकरकपात, पुण्यातील २५०० कर्मचाऱ्यांना राजीनामा द्यायला लावला, कुटुंबाच्या अडचणी वाढल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com