

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. १० वी पास तरुणांना सरकारी कंपनीत नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. कोचीन शिपयार्डमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. कोचीन शिपयार्ड ही सरकारी कंपनी आहे. यामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये हॉस्टेल सुपरिटेंडेंट/वॉर्डन पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही cochinshipyard.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
कोचीन शिपयार्डमधील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २७ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही अर्ज करायचे आहेत. कोचीन शिपयार्ड लिमिटेड ही शिपबिल्डिंग आणि शिप रिपेअर करणारी कंपनी आहे. या कंपनीत नोकरी केल्यावर तुम्हाला कामाचा अनुभव येईल. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी आहे.
कोचीन शिपयार्डमध्ये METI होस्टल सुपरिटेंडेंट/वार्डन पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५८ पेक्षा जास्त नसावे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ५ वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टवर होणार आहे.
कोचीन शिपयार्डमधील नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला ३६,५०० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड १०० गुणांच्या प्रॅक्टिकल टेस्टद्वारे होणार आहे.
अर्ज कसा करावा? (How To Apply)
सर्वात आधी cochinshipyard.in या वेबसाइटवर जा.
यानंतर CSL, Kochi च्या Career Page वर क्लिक करा.
यानंतर Vacancy Notification- Selection to the post of METI Hostel Superintendent/Warden on Contract Basis यावर क्लिक करा.
यानंतर रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर सर्व माहिती-कागदपत्रे अपलोड करा.
यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करा. त्याआधी प्रिंट आउट काढून घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.