युक्रेनने रशियाच्या कुर्स्क आणि झापोरिझिया येथील अणुऊर्जा प्रकल्पांवर भयंकर ड्रोन हल्ले चढवले आहेत . या हल्ल्यानंतर कुर्स्क अणुप्रकल्पातील एका रिक्टरची कार्यक्षमता कमी झाली आहे त्याबरोबरचं आसपासच्या शहरातही रेडिएशनचा धोका निर्माण झालाय .. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही या हल्ल्यांची पुष्टी केली आहे. या हल्ल्यानंतर रशिया कडून प्रतिहल्ला केला जाण्याची शक्यता आहे.
युक्रेनच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून रशियानेही आपल्या अणु-पाणबुड्या सक्रिय केल्या आहेत आणि युक्रेनवर मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे. या निमित्तानं हे युद्ध एका नवीन आणि अधिक धोकादायक टप्प्यात पोहचलं आहे . त्यामुळे अण्वस्त्रांचा वापर होण्याची शक्यताही वाढलीय. १९४९ च्या जिन्हीवा करारा नुसार जागतीक युध्द नियमांनुसार कोणत्याही देशानं अणूकेद्रावर केलेले हल्ले म्हणजे युध्द गुन्हा ठरवला जातो मात्र युक्रेनच्या युध्दखोरीवर अमेरिका आणि युरोप पुर्णत गप्प असल्याचं पाहायला मिळतं आहे.
संयुक्त राष्ट्रांची अण्वस्त्र देखरेख संस्था IAEA म्हणजेच International Atomic Energy AgencY ने देखील या हल्ल्यांवर चिंता व्यक्त केली आहे आणि सर्व अणुसुविधांची सुरक्षा वाढवण्याचं आवाहन केले आहे. ही परिस्थिती जागतिक सुरक्षेसाठी एक मोठा धोका निर्माण झाला आहे .
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.