Crime News : संतापजनक! प्रसादाची केळी खाल्ली म्हणून जमावाची जबर मारहाण, तरुणाचा तडफडून मृत्यू

Delhi Crime News : सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Crime News
Crime Newssaam tv

Delhi Crime News :

देशाची राजधानी दिल्लीतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नंदनगरी भागात एका धार्मिक कार्यक्रमात मृत तरुण सहभागी होण्यासाठी गेला होता. दरम्यान कार्यक्रमात तरुणाने प्रसाद उचलून खाल्ल्याने संतप्त झालेल्या जमावाने तरुणाला खांबाला बांधून बेदम मारहाण केली. या मारहाणीतच तरुणाचा मृत्यू झाला. मोहम्मद इसार असं २६ वर्षीय तरुणाचे नाव आहे. (Latest Marathi News)

Crime News
Marriage Hall Fire: लग्नसोहळा सुरू असताना मंडपात भीषण आग; वधू-वरासह शेकडो वऱ्हाडी होरपळले, भयंकर घटना!

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद इसार सुंदर नगरीमध्ये राहायचा. तो मानसिक रुग्ण होता अशी माहिती समोर येत आहे. 26 सप्टेंबरला पहाटे 4 च्या सुमारास भटकत असताना तो घराजवळील एका मंदिरात पोहोचला. धार्मिक कार्यक्रमानिमित्त तेथे चौकी उभारण्यात आली होती. (Crime News)

इसारने मंदिराजवळील व्यासपीठावरून प्रसाद म्हणून केळी उचलली आणि खाण्यास सुरुवात केली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी इसारला पकडून दोरीने खांबाला बांधले आणि त्याला बेल्ट, काठीने मारहाण करण्यात आली.

Crime News
Nashik Mobile Blast: मोबाईलच्या स्फोटाने नाशिक हादरलं! घरांच्या काचा फुटल्या, ३ जण जखमी

मंगळवारी सायंकाळी इसार त्याच्या पालकांना घराबाहेर पडलेला दिसला. त्याच्या संपूर्ण शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. मारहाणीच्या वेदनेने तो ओरडत होता. काही तासातच इसारचा त्याच्या घरी मृत्यू झाला. इसारच्या वडिलांनी पीसीआरला फोन करून पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com