Yashwant Verma Case: जस्टिस वर्मा यांच्या घरात जळालेल्या नोटांचा ढिगारा, धक्कादायक VIDEO आणि फोटो व्हायरल

Justice Yashwant Verma Case Update: न्यायाधिश यशवंत वर्मा यांच्या घरामध्ये आढळून आलेल्या जळालेल्या नोटांच्या खचाचा व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. स्टोअर रूममध्ये सापडलेल्या रोख रकमेबद्दल माझा काहीही संबंध नाही असे वर्मा यांनी सांगितले.
Yashwant Verma Case: जस्टिस वर्मा यांच्या घरात जळालेल्या नोटांचा ढिगारा, धक्कादायक  VIDEO आणि फोटो व्हायरल
Yashwant Verma CaseSaam Tv News
Published On

दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराला लागलेली आग आणि घरात आढळलेल्या जळालेल्या नोटांचा ढिगारा या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. न्यायाधीश वर्मा यांच्या घरात जळालेल्या नोटांचा जे बंडल आढळले होते त्याचे व्हिडीओ आणि फोटो समोर आला आहे. मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या आदेशावरून जस्टिस वर्मा यांच्या घराच्या आतमध्ये साडपलेल्या जळालेल्या नोटांचे फोटो आणि व्हिडीओ सार्वजनिक करण्यात आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

न्यायमूर्ती वर्मा जरी म्हणत असले की या नोटांशी माझा काही संबंध नाही तरी देखील त्यांच्या घरामध्ये आढळेली रोकड आली कुठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी सापडलेल्या नोटा आल्या कशा याची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणाशी संबंधित दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश डीके उपाध्याय यांचा रिपोर्ट देखील सार्वजनिक करण्यात आला आहे. जस्टिस वर्मा यांनी दिलेलं उत्तरही जाहीर करण्यात आले आहे. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रही वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहेत.

न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याचे प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येत आहे. आता यशवंत वर्मा यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत आणि असा दावा केला आहे की, 'त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने स्टोअररूममध्ये कोणतीही रोकड ठेवली नव्हती.' सरन्यायाधीशांनी रोख रकमेच्या वसुलीच्या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश डीके उपाध्याय यांनी न्यायमूर्ती वर्मा यांच्याकडून त्यांच्यावरील आरोपांवर उत्तर मागितले होते.

Yashwant Verma Case: जस्टिस वर्मा यांच्या घरात जळालेल्या नोटांचा ढिगारा, धक्कादायक  VIDEO आणि फोटो व्हायरल
Delhi Capitals: IPL आधी सर्वात मोठा उलटफेर; दिल्लीने फाफ डू प्लेसिसकडे अचानक सोपवली मोठी जबाबदारी

न्यायमूर्ती डीके उपाध्याय यांना पाठवलेल्या पत्रात न्यायमूर्ती वर्मा यांनी लिहिले आहे की, 'मला किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला स्टोअर रूममध्ये सापडलेल्या रोख रकमेबद्दल कोणतीही माहिती नाही.' ही रोकड मला किंवा माझ्या कुटुंबाला दाखवण्यात आली नाही.

न्यायमूर्ती वर्मा म्हणाले की, '१४-१५ मार्चच्या रात्री त्यांच्या सरकारी निवासस्थानाच्या स्टोअर रूममध्ये आग लागली. हे स्टोअर रूम त्यांच्या स्टाफ क्वार्टरजवळ आहे. स्टोअर रूमचा वापर सामान्यतः न वापरलेले फर्निचर, बाटल्या, भांडी, वापरलेले कार्पेट इत्यादी ठेवण्यासाठी केला जातो. त्या स्टोअर रूममध्ये सीपीडब्ल्यूडीचे साहित्य देखील ठेवले जाते. स्टोअर रूमला कुलूप नाही आणि अनेक अधिकारी तिथे येत-जात राहतात. या स्टोअर रूममध्ये पुढच्या आणि मागच्या दोन्ही दाराने प्रवेश करता येतो. ते माझ्या निवासस्थानाशी थेट जोडलेले नाही आणि माझ्या घराचा भाग नाही.', असे न्यायमूर्ती वर्मा यांनी सांगत या पैशांशी माझा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Yashwant Verma Case: जस्टिस वर्मा यांच्या घरात जळालेल्या नोटांचा ढिगारा, धक्कादायक  VIDEO आणि फोटो व्हायरल
Delhi Politics: दिल्लीवर 'लाडक्या बहिणीं'ची सत्ता! भाजपनंतर आपनंही खेळला 'महिला कार्ड'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com