Womens Reservation Bill: भाजपमध्ये ८५ खासदार अन् पंतप्रधानही OBC; राहुल गांधींच्या प्रश्नावर शहांनी वाचला ओबीसीचा पाढा

Mahila Aarakshan Bill 2023: महिला आरक्षण विधेयकाच्या चर्चेवेळी राहुल गांधी यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.
Amit Shah
Amit ShahSaam TV (Sansad Tv)
Published On

Rahul Gandhi VS Amit Shah:

मोदी सरकारनं बोलवलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक पारित करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं लोकसभेत महिला विधेयक मांडलं होतं, ते बहुमतानं पारित करण्यात आलं. दरम्यान विधेयकाच्या चर्चेवेळी राहुल गांधी यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. (Latest News on Politics)

ओबीसी समाजाची देशातील सत्तेत असलेल्या अल्प भागीदारीवरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. भाजप जातीय जनगणनेपासून लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला. दरम्यान राहुल गांधींच्या या हल्लाबोलवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उत्तर दिलं.

काय म्हणाले राहुल गांधी

आज लोकसभेत होणारी चर्चा भारतातील लोकांकडे सत्ता हस्तांतरित करण्याबाबत आहे. यामध्ये महिला एक घटक आहे आणि ओबीसी समुदाय हा दुसरा घटक आहे. काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा दिलाय,पण तरीही हे विधेयक काही गोष्टींमुळे अपूर्ण आहे. तसेच महिला आरक्षण विधेयक आत्ताच का लागू करत नाहीत? असा सवाल राहुल गांधींनी सरकारला केला. त्याचबरोबर राहुल गांधींनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. “भारतात एकूण ९० सचिव आहेत. जे भारताचं सरकार चालवतात आणि अर्थसंकल्प नियंत्रित करतात. त्यामध्ये ओबीसी समुदायाचे लोक किती आहेत? असा प्रश्न राहुल गांधींनी केला.

भारतातील ९० पैकी केवळ ३ सचिव ओबीसी समुदायाचे आहेत. हे ओबीसी सचिव भारताचा केवळ पाच टक्के अर्थसंकल्प नियंत्रित करतात. याच अर्थ असा की, भारताचा अर्थसंकल्प ४४ लाख कोटींचा असेल तर केवळ २.४७ लाख कोटी म्हणजेच ५ टक्के अर्थसंकल्प यांच्या नियंत्रणात आहे.” ही एक लाजिरवाणी बाब असून हा ओबीसी समुदायाचा अपमान असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

तसेच देशात किती टक्के ओबीसी समुदाय आहे? किती दलित आहेत? किती आदिवासी आहेत? या प्रश्नांची उत्तरं केवळ जातीय जनगणनेतूनच मिळू शकतात, याबाबतचा तपशील लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

अमित शहांचे उत्तर

राहुल गांधी यांनी आक्रमक भाषण केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिलं. सचिव सरकार चालवतात. सरकार मंत्रिमंडळ चालवते. देश चालवणाऱ्या लोकांमध्ये फक्त ३ ओबीसी आहेत. पण ते देश सरकार चालवतात. देशाचे धोरण कॅबिनेट, संसद ठरवते. जर आकडेच हवे तर ऐका, भाजपचे २९ टक्के खासदार म्हणजेच ८५ खासदार ओबीसी आहेत. तुलना करायची असेल तर करा. केंद्रीय मंत्रिमंडळात २९ मंत्री ओबीसी आहेत. आम्ही पंतप्रधान सुद्दा ओबीसीतून दिला. पण तुमच्या पक्षानं कधीच ओबीसी पंतप्रधान बनवला नाही, असा टोलाही राहुल गांधींना त्यांनी लागावला.

Amit Shah
Women Reservation Bill: मोदी सरकार महिला आरक्षणासाठी घटनेत दुरुस्ती करणार; काय आहे 'नारीशक्ती वंदन' कायदा?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com