संतापजनक: महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा पोलिसांवर थुंकल्या; Video व्हायरल

या घटनेचा व्हिडीयो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आपलं कर्तव्य पार पाडत असणाऱ्या पोलिसांवर थुंकन एका राष्ट्रीय पक्षाच्या महिला अध्यक्षांना अशोभनीय वर्तन केल्याची टीका त्यांच्यावर करण्यात येत आहे.
Women's Congress president Netta D'Souza spat at the women police
Women's Congress president Netta D'Souza spat at the women policeSaam TV/ ANI
Published On

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग केस प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सध्या ED कडून चौकशी चालू आहे. या चौकशी विरोधात काँग्रेसकडून देशभर निदर्शन करण्यात येत आहेत. दरम्यान, ईडीविरोधात केले जात असणाऱ्या निदर्शना दरम्यान, काँग्रेसच्या (Congress) महिला अध्यक्षा नेट्टा डिसोझा (Netta D'Souza) यांनी एक अतिशय अशोभनीय कृत्य केलं आहे.

पाहा व्हिडीओ -

सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीकडून (ED) चौकशी सुरू असल्याने काँग्रेस समर्थक (Congress supporters) आक्रमक झाले आहेत. यासाठी काँग्रेसकडून अनेक ठिकाणी आंदोलने आणि निदर्शने केली जात आहेत. मात्र, नवी दिल्लीमध्ये या आंदोलकांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता. आंदोलनात सहभागी असणाऱ्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा या पोलीस कर्मचाऱ्यांवर थुंकल्या धक्कादायक आणि तेवढंच अशोभनीय कृत्य त्यांनी केलं आहे.

Women's Congress president Netta D'Souza spat at the women police
Presidential Election: द्रोपत्ती मुर्मो असणार एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार

या घटनेचा व्हिडीयो (Video) सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आपलं कर्तव्य पार पाडत असणाऱ्या पोलिसांवर थुंकन एका राष्ट्रीय पक्षाच्या महिला अध्यक्षांनी अशोभनीय वर्तन केल्याची टीका त्यांच्यावर करण्यात येत आहे. दरम्यान राहुल गांधी यांची मनी लॉन्डरिंग (Money laundering) प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यांची ईडीकडून पाच दिवसात जवळपास ५० तास चौकशी करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com