भटक्या कुत्र्यांना खायला घातलं, श्वानप्रेमी महिलेला मारहाण; कानाखाली मारतानाचा Video Viral

Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भटक्या कुत्र्यांना जेवण दिल्याप्रकरणी एका महिलेला मारहाण झाल्याचे पाहायला मिळते. मारहाण करणाऱ्यावर कारवाई झाली आहे.
viral video
viral videox
Published On
Summary
  • भटक्या कुत्र्यांना खायला घातल्यामुळे श्वानप्रेमी महिलेला मारहाण करण्यात आली.

  • आरोपीने महिलेला वारंवार कानाखाली मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Video : भटक्या कुत्र्याला खायला दिल्याच्या रागात एका व्यक्तीने महिलेला मारहाण केली. त्याने महिलेच्या अनेकदा कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित कलमांखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या विजयनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सिद्धार्थ विहार येथील ब्रह्मपुत्र एन्क्लेव्ह सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. एक श्वानप्रेमी महिला सोसायटीमधील भटक्या कुत्र्यांना जेवण खायला घालत होती. या दरम्यान एका व्यक्तीने महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला. महिलेशी त्या व्यक्तीचा वाद झाला. महिलेच्या वक्तक्यावरुन हा व्यक्ती इतका भडकला, की त्याने महिलेला कानाखाली मारायला सुरुवात केली.

व्हायरल व्हिडीओमध्ये ही व्यक्ती महिलेला सतत कानाखाली मारत असल्याचे पाहायला मिळते. मारहाण सुरु असताना महिला कोणालातरी संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवण्यास सांगताना दिसते. घटनेचा व्हिडीओ बनवत असल्याचे समजल्यावर तो महिलेला सोडतो आणि आणखी व्हिडीओ बनवा असे कॅमेऱ्यामध्ये बघून ओरडतो. आसपासच्या लोकांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद शांत झाला होता.

viral video
तो आला अन् माझ्या स्तनांना स्पर्श केला, प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला तिच्यासोबत घडलेला भयंकर अनुभव

हा व्हिडीओ कोणीतरी सोशल मीडियावर अपलोड केला. व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेची दखल घेत विजय नगर पोलीस स्टेशनने महिलेशी गैरवर्तन करत तिला मारहाण करणाऱ्या आरोपी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. सदर व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात पुढील कारवाई सुरु आहे.

viral video
Police Death : ड्युटीवर असताना छातीत दुखू लागलं, पोलीस निरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com