Shocking : गाईचे दूध प्यायल्यामुळे महिलेचा मृत्यू, गावात एकच खळबळ, कारण वाचून धक्का बसेल

Rabies Death Linked to Cow's Milk: गाईचे दूध पिल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. होय, खरेय गाईला रेबीज झालेला होता, कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत, त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला.
Rabies Death Linked to Cow's Milk
Rabies Death Linked to Cow's Milk
Published On

Rabies Death Linked to Cow's Milk: गाईचे दूध पिल्यानंतर ४० वर्षीय महिलेचा रेबीज संक्रमणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ग्रेटर नोएडा येथे घडली आहे. महिला ज्या गाईचे दूध पिली, त्या गाईला कुत्रा चावला होता, असे तपासात समोर आले आहे. जेवरमधील थोरा गावात शनिवारी ही धक्कादायक घटना घडली. रेबीज संक्रमणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच गावात एकच खळबळ उडाली.

महिलेचा रेबीज संक्रमणामुळे मृत्यू झाला. महिलेला धक्कादायक म्हणजे कोणताही प्राणी चावला नव्हता. तर गाईचे कच्चे दूध पिल्यामुळे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. गाईला काही दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता. गाईवर कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत, त्या महिलेने त्याच गाईचे कच्चे दूध पिलं अन् मृत्यूला आमंत्रण दिले. नोएडामधील थोरा गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गाईला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. कुत्रा चावल्यामुळे गाई रेबीज संक्रमीत झाली होती. गाईची प्रकृती ढासळत होती. त्यातच दोन महिन्यापूर्वी तिने वासराला जन्म दिला. परंपरेनुसार, गाईचे पहिले दूध गावात वाटले गेले. गाईची प्रकृती अधिक खराब होऊ लागल्यानंतर पशु चिकित्सककडून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गाईला रेबीजचे संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गाईचे दूध पिणाऱ्यांनी रेबीजचे इंजिक्शन घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

गाईच्या मालकिनीने आणि कुटुंबाने तात्काळ रेबीजचे इंजिक्शन घेतलं. पण शेजारी राहणाऱ्या ४० वर्षीय सीमा यांनी इंजिक्शन घेतलं नाही. काही दिवसानंतर सीमा यांची प्रकृती बिघडली. त्यांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या रिपोर्ट्सनुसार, सीमा यांचा मृत्यू रेबीजमुळे झाला.

काळजी घ्या..

रेबीज फक्त कुत्रा चावल्यामुळेच होतो, असे नाही. जनावरांच्या दुधामार्फतही रेबीज पसरू शकतो, असे या घटनेवरून स्पष्ट दिसतेय. त्यामुळे कुत्रा चावल्यानंतर तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे. जर कोणत्या जनावराला कुत्रा चावला अथवा तो रेबीज संक्रमित असेल, तर त्याच्या दुधाचे सेवन करू नये. त्या जनावराचा तात्काळ उपचार करण्यात यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com